Pune News : पुण्यात बाइक टॅक्सी कंपनी 'रॅपीडो' विरोधात गुन्हा दाखल

rapido bike taxy case has been filed against bike taxi company rapido in pune
rapido bike taxy case has been filed against bike taxi company rapido in pune Esakal
Updated on

पुणे : रिक्षा चालकांच्या विरोधामुळे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली बाइक टॅक्सी ॲप चालवणारी कंपनी 'रॅपीडो' विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडात्मक कलम ४२०, ५०५, ११४ अन्वये प्रमाणे कलमवाढ करुन रॅपीडो कंपनी व रॅपीडो कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा आरोपी म्हणून यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुक करून घेऊन त्याच्या मोबदल्यामध्ये रॅपीडो कंपनी आर्थिक फायदा करुन घेत असल्याने रॅपीडो कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील व अन्य अधिकारी यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'


दरम्यान खाजगी दुचाकी वाहनांचा बेकायदेशीरपणे व्यवसायीक वापर करण्यास चिथावणी देऊन, दुचाकी चालकांकडून बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करुन घेणे, तसेच त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यामधून शासनाला कोणताही कर न भरता शासनाचीही फसवणुक करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.

rapido bike taxy case has been filed against bike taxi company rapido in pune
Congress News: "2500 किमी चालूनही…"; दिल्लीच्या थंडीत T-Shirtवरील राहुल गांधींचा फोटो NCP नेत्याने केला शेअर

यामध्ये रॅपीडो कंपनी व रॅपीडो कंपनीचे अधिकारी अरविंद सांका आणि शांतनु शर्मा यांचाही सहभाग असल्याने अरविंद सांका आणि शांतनु शर्मा यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

rapido bike taxy case has been filed against bike taxi company rapido in pune
Crime News: दारु पिण्यासाठी १०० रुपये दिले नाहीत, नातवानं आजीचे कुऱ्हाडीनं केले तुकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.