खोटे प्रमाणपत्र सादर करून आजोबांच्या मृत्यूची दोन वेळा नोंद

मालमत्ता बळकाविण्यासाठी प्रकार; नातवाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
खोटे प्रमाणपत्र सादर करून आजोबांच्या मृत्यूची दोन वेळा नोंद
Sakal Media
Updated on

मंचर : आजोबांच्या मृत्यूची नोंद मंचर ग्रामपंचायतीत झाली होती. पण एकत्रित कुटुंबातील जमीन व मालमत्ता बळकवण्यासाठी दुसऱ्यांदा तहसीलदार कार्यालयात खोटे प्रमाणपत्र सादर करून मृत्यूचा दाखला प्राप्त करून मंचर ग्रामपंचायतीत आजोबांच्या मृत्यूची नोंद करून घेतली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शासनाची व मंचर ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी नातू सोमनाथ तुकाराम भेके (रा. भेकेमाळा, मंचर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खोटे प्रमाणपत्र सादर करून आजोबांच्या मृत्यूची दोन वेळा नोंद
पुणे : बाजार समितीने टेम्पो चालकांबाबत घेतला मोठा निर्णय

याप्रकरणी मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजणे(रा.जारकरवाडी.ता आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (कै)सहादु लक्ष्मण भेके (रा. भेकेमळा, मंचर) या आजोबांच्या मृत्युची नोंद ता.२८ डिसेंबर १९६९ रोजी मंचर ग्रामपंचायतीत झाली होती. पण एकत्रित कुटुंबातील जमीन व इतर मालमत्ता बळकविण्यासाठी नातवाने शककल लढवून आजोबाचा मृत्यु ता.७ डिसेंबर १९९५ रोजी झाल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तहसिलदार कार्यालयात घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे सादर करून मृत्युचा दाखला प्राप्त केला. त्यानुसार ता.२२जुलै २००७ रोजी मंचर ग्रामपंचायतीत आजोबांच्या मृत्यूची नोंद करून घेतली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शासनाची व मंचर ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी नातू सोमनाथ तुकाराम भेके (रा. भेकेमाळा, मंचर) याच्याविरोध गुन्हा दाखल केला आहे.

खोटे प्रमाणपत्र सादर करून आजोबांच्या मृत्यूची दोन वेळा नोंद
पुणे : बाजार समितीने टेम्पो चालकांबाबत घेतला मोठा निर्णय

मृत्यूच्या दाखल्याचा उपयोग शासकीय कामासाठी वापरला जात होता. याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. आंबेगावचे तहसिलदार रमा जोशी यांनी पोलीसांकडे फिर्याद देण्याविषयी भोजणे यांना आदेश दिले होते. अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.

(कै)सहादु लक्ष्मण भेके यांच्या मृत्यूची दोन वेळा ग्रामपंचायतीत नोंद झाल्याची तक्रार तहसिलदार कार्यालयात परशुराम भेके यांनी केली होती. त्यानुसार तहसील कचेरीत चौकशीची चक्र फिरली. सोमनाथ तुकाराम भेके यानी शासनाची व ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचे निष्पन झाले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा केलेली मृत्यूची नोंद रद्द केली आहे. ता.२८ डिसेंबर १९६९ रोजीची मृत्युची नोंद कायम ठेवली आहे.

-कचरदास भोजणे, ग्रामविकास अधिकारी, मंचर ग्रामपंचायत

खोटे प्रमाणपत्र सादर करून आजोबांच्या मृत्यूची दोन वेळा नोंद
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.