पुणेकरांनो, मुळशी, नाणेघाट परिसरात येताय? सावधान !

पुणेकरांनो, मुळशी, नाणेघाट परिसरात येताय? सावधान !
Updated on

कोळवण : कोरोनामुळे सध्या पर्यटनास बंदी असतानाही मुळशी तालुक्यात पर्यटनास आज आलेल्या 50 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडुन 25 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. कोरोना विषाणूचा धोका आजुन टळलेला नसुन रूग्ण संख्या वाढत आहे. तहसिलदार अभय चव्हाण यांनी मुळशीतील सर्व पर्यटनस्थाळावर पर्यटनास बंदी घातली आहे. जेणेकरून पर्यटनामुळे कोरोना संसर्ग वाढू नये. याबाबत कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे आदेश पौड पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मुळशी तालुक्यातील भूगाव, घोटावडे फाटा, पौड, माले, मुठा खिंड या ठिकाणी पौड पोलिस स्टेशनकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची पुर्णपणे चौकशी करुनच वाहने सोडली जात असून मुळशीत येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

पुणेकरांनो, मुळशी, नाणेघाट परिसरात येताय? सावधान !
पुणे विद्यापीठात पक्षांसाठी सजविले 'डायनिंग टेबल'

पौड पोलिसांकडून 60 पर्यटकांवर कारवाई

पिरंगुट : पौड पोलिसांनी शनिवारी साठहून अधिक पर्यटकांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपये दंड वसूल केला. पर्यटनास बंदी असतानाही शहर पोलिसांचा डोळा चुकवून मुळशीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सख्या लक्षात घेऊन पौड पोलिसांनी आज कडक कारवाईचे धोरण स्वीकारले, त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवासा रस्त्यावर मुठा घाटात उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सुधीर होळकर, नितीन गार्डी, जय पवार, गणेश साळुंके यांनी तर कोलाड रस्त्यावर पौड येथील शासकीय गोदामासमोर सहाय्यक निरीक्षक विनायक देवकर, तुषार भोईटे यांच्या पथकाने तपासणी नाके उभारून पर्यटकांवर कारवाई केली. आज दिवसभरात सुमारे दोनशेहून अधिक चारचाकी वाहने परतवून लावली. मुळशीत पर्यटनास बंदी असल्याने पर्यटकांनी वर्षा विहारासाठी मुळशीत न येण्याचे आवाहनही पौड पोलिसांनी केले आहे.

पुणेकरांनो, मुळशी, नाणेघाट परिसरात येताय? सावधान !
पुणे : चार धरणात मिळून पाणीसाठ्यात 0.75 TMCची वाढ

नाणेघाटात 56 जणांवर दंडात्मक कारवाई

जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाट व दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या हौशी पर्यटकांना आज शनिवार (ता. १९ रोजी) जुन्नर पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. नाकाबंदीत ५६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. पर्यटन स्थळाकडे जाण्यास बंदी असताना देखील सुट्टीच्या दिवशी नाणेघाट व दाऱ्याघाटाकडे पर्यटकांचा ओढा वाहू लागला आहे. त्यांना पायबंद घालण्यासठी जुन्नर-आपटाळे मार्गावर निरगुडेजवळ पोलिसांनी सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू केली होती. यासाठी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कारवाईत विनामास्क १६ तर विनाकारण फिरणारे ४० अशा एकूण ५६ जणांकडून २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच त्यांना येथूनच माघारी पाठविण्यात आले. कोरोना अजून गेला नाही, लॉक डाऊन कायम आहे, पर्यटन स्थळे बंद आहेत. यामुळे दुचाकी,चारचाकी वाहनातून सुट्टीच्या दिवशी येथे सहलीसाठी येऊ नये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो म्हणून येथे येण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. यापूर्वी केलेल्या विनाकारण फिरणाऱ्या ४९ जणांवर केलेल्या कारवाईत २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

पुणेकरांनो, मुळशी, नाणेघाट परिसरात येताय? सावधान !
पुणे दुसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध? महापौरांनी दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.