पुणे: पुण्यात शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. शनिवारी काही वेळा जोरदार सरी पडल्या. रविवारी (ता. २५) संपूर्ण जिल्ह्याला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. रविवारी जिल्ह्यात घाटमाथ्यावर अत्यंत जोरदार म्हणजे २०४ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुण्यात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुणे सातारा, रायगड रेड अलर्ट
नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.