Pune Rain Update : मार्केट यार्डात शेतमालाची आवक कमी; खरेदीदार नसल्याने शेतमाल शिल्लक

पावसामुळे खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी कमी प्रमाणात आल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
reduced arrival of farm produce vegetables in market yard pune
reduced arrival of farm produce vegetables in market yard pune sakal
Updated on

मार्केट यार्ड: पुणे जिल्ह्यासह राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात गुरुवारी शेतमालाची आवक ३०-३५ टक्क्यांनी घटली होती. परंतु पावसामुळे खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी कमी प्रमाणात आल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली. तसेच खरेदीदार कमी आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमाल शिल्लक राहिला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा शेतमालाच्या आवकेवर देखील परिणाम झाला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सरासरी गुरुवारी ३० टक्केच शेतमालाची आवक घटली आहे. गुरुवारच्या पावसामुळे शुक्रवारी होणाऱ्या शेतमालाच्या आवकेवर परिणाम होणार आहे. सततच्या पावसामुळे शहरातील ग्राहक अत्यंत कमी प्रमाणात शेतमाल खरेदी करण्यास आला आहे.

बाजारात शेतीमाल खरेदीदर कमी आल्याने गाळ्यांवर अनेक ठिकाणी शेतमाल शिल्लक आहे. यामुळे शेतकरी, अडते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पालेभाज्या कोथिंबीर, मेथी, पालक यासह विविध प्रकारच्या पालेभाज्या खराब झाल्या असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सगळीकडे पाऊस सुरू आहे. शेतमालाच तोडणी कमी असल्याने आवक कमी आहे. भाजीपाला विक्रेते जास्त प्रमाणात रस्त्यावर माल विकतात. त्यामुळे आज निम्म्यापेक्षा दुकाने बंद आहेत त्यामुळे खरेदी कमी झाली आहे. दर वाढ कोणतीही झालेली नाही. पाऊस बंद झाल्यानंतर दोन दिवसात शेतमालाची आवक पूर्ववत होईल.

- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन.

पावसामुळे मार्केट यार्डात गुरुवारी ३० टक्के आवक घटली होती. आवक कमी असली तरी भाज्यांचे भाव स्थिर आहेत. पावसामुळे खरेदीदार कमी प्रमाणात बाजारात आले.

- बाळासाहेब कोंडे, फळे-भाजीपाला विभागप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.