‘प्रादेशिक भाषा, कलाकारांचे खच्चीकरण करू नका़’; डॉ. नीलम गोऱ्हे

प्रसार भारतीने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित होणारे कार्यक्रम १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहेत.
 Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam GorheSakal
Updated on
Summary

प्रसार भारतीने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित होणारे कार्यक्रम १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहेत.

पुणे - आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरील कार्यक्रम रद्द (Program Cancel) करून मुंबई केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याची सक्ती करणारा प्रसार भारतीचा (Prasar Bharti) आदेश हा चुकीचा असून त्यामुळे प्रादेशिक भाषा (Regional Language) व कलाकारांचे (Artist) खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नवा आदेश तातडीने रद्द करावा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी प्रसार भारतीकडे बुधवारी एका निवेदनाद्वारे केली.

प्रसार भारतीने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित होणारे कार्यक्रम १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहेत. या केंद्रांनी त्या वेळेत मुंबई केंद्राच्याच कार्यक्रमांचे प्रक्षेपण करायचे आहे, असे असे प्रसार भारतीच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे पुणे, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, सांगली, परभणी, सिंधुदुर्ग आदी विविध केंद्रांवरील वृत्तनिवेदक, स्थानिक कलाकार संतप्त झाले आहेत.

 Dr. Neelam Gorhe
पुणे बार असोसिएशनची निवडणूक १८ फेब्रुवारीला

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी एस. वेमपती यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘अलीकडेच प्रसार भारतीने आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांचे प्रादेशिक कार्यक्रम रद्द करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आकाशवाणी मुंबई वरून एक सामायिक कार्यक्रम प्रसारित केला जाईल असा निर्णय घेतला आहे. हे असे प्रादेशिक भाषा व कलाकारांचे खच्चीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकारने अंमलात आणण्याचे नियोजन केले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.’

आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरून आतापर्यंत विविध प्रादेशिक कार्यक्रम प्रसारित केले जात होते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या विविध क्षेत्रांच्या आकांक्षांना योग्य प्रतिनिधित्व दिले. तसेच अनेक स्थानिक कलाकारांना विविध केंद्रांवर आपली कला सादर करण्याची संधी मिळत. नव्या आदेशामुळे ती संधी डावलली जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेवर अन्याय करणार निर्णय रद्द करावा आणि पूर्वीची प्रथा पूर्ववत करावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.