Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. यामुळे आमदार राहुल कुल यांना दिलासा मिळाला आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या विषयीचा तारांकित प्रश्न मनीषा कायंदे यांनी मांडला असून, या कारखान्यात १६० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात कारखान्याच्या २०२१-२२ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या कारखान्याची सहकारी संस्था अधिनियम १०६० चे कलम ८३ अन्वये चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर या चौकशीकरिता चौकशी अधिकारी विशेष लेखा परीक्षक-वर्ग १, सहकारी संस्था (साखर) पुणे यांची नेमणूक केल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हे आरोप झाले आहेत. संजय राऊत यांना कारखान्याबद्दल अजिबात माहिती नाही. राऊत यांना कारखान्याशी काही देणेघेणे नाही. त्यांनी केवळ राजकारण म्हणून हा विषय मांडला. त्यात काही तथ्य नाही
- राहुल कुल, आमदार, दौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.