पुणे : महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून पालिकेच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या सदनिकांची भाडेवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीने आज (मंगळवारी) घेतला, अशी माहिती स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.(relief to municipal servants in house rent)
'महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा घरभाड्याची कपात करण्यात येते. सातवा वेतन आयोग लागू होताना त्यांच्या पगारवाढीपेक्षा घराचे भाडे जास्त वाढले आहे. त्यामुळे वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा कोणताही फायदा होणार नव्हता. तसेच महापालिकेच्या सदनिकांची दुरवस्था झाल्याने प्रस्तावित वाढ अन्यायकारक ठरणार असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली होती. भाजपचे माजी सभागृहनेते धिरज घाटे यांनी महापालिकेच्या इमारतींमध्ये भाडेपट्ट्याने राहणाऱ्या सर्व सेवकांची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच घरभाड्याची आकारणी करावी असा प्रस्ताव दिला होत. त्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली.(Pune News)
धिरज घाटे म्हणाले,‘‘कर्मचाऱ्यांना ७वी वेतन आयोग लागू झाला तरी महापालिकेची घरे जुनी झाली असून, घर गळत आहे, स्वच्छतागृह स्वतंत्र नाहीत, अनेक ठिकाणच्या वसाहती मोडकळीस आलेल्या आहेत. अशी दुरवस्था झालेली असताना १० हजार ते १२ हजार भाडे महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून घेणे योग्य नाही, त्यामुळे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे भाडे आकारावे असा प्रस्ताव दिली होता. त्यास मान्यता दिल्याने १४ वसाहतीतील याचा फायदा सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पीएमपीएमएल बस चार्जिंग स्टेशनसाठी सव्वाकोटी
बाणेर येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस चार्जिंग स्टेशनमध्ये सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांची विद्युतविषयक विकासकामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली . या कामासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दर असणाऱ्या निविदेला मान्यता दिली.
बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहासाठी निधी
कोथरूड येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहात विविध विद्युत विषयक कामे करण्यासाठी ७५ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली इन डोअर फिटिंग, पंखे, वॉटर कुलर, पॉइंट वायरिंग, केबल टाकून विद्युत व्यवस्था, पी ए सिस्टिम बसविणे आदी कामे केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.