शिनोली (पुणे) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर कोरोना विषाणूच्या महामारीमुळे भाविकांसाठी बंद केले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारीही मंदिर परिसरात शुकशुकाट होता. मात्र, येथील पुजाऱ्यांनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक केला.
आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला...
भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावणी सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक व पर्यटक येत असतात. पंरतु, या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. त्यामुळे काल पहिल्या श्रावणी सोमवारीही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात शुकशुकाट होता. परिसरात बंदोबस्तासाठी घोडेगावचे पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...
कोरोना महामारी आंबेगाव तालुक्याचा हॉटेल व्यवसायावर आदळली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर हजारो भाविक व पर्यटक येत असतात. विशेषत: महाशिवरात्र व श्रावण महिन्यात उच्चांकी गर्दी असते. या भाविक व पर्यटकांवर येथील सुमारे 175 व्यवसायिकांचे पोट भरत असते. यामध्ये हॉटेल, लॉजिंग आदी व्यवसायांबरोबर स्थानिक नागरिक देवाचे बेलफूल, नारळ, कंदी पेढे, कटलरी, वनऔषधे, पावसाळ्यात प्लॅस्टीक कागद, रानमेवा, रानभाज्या विक्री करत असतात. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.