वालचंदनगर : रणगाव येथील दत्तात्रेय साळुंके व विष्णू साळुंके हे दोन सख्खे भाऊ खंडकरी शेतकरी असून गेल्या आठ वर्षांपासून शासनाकडून मिळालेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन दरबारी हेलपाटे मारत आहेत. महसूल प्रशासनाच्या कारभाराला कंटाळले असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी बारामतीच्या प्रांतधिकारी यांच्या कार्यालयासमोर दोघांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. (Pune News)
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने सन २०१२-१३ मध्ये इंदापूर तालुक्यासह राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनीचे वाटप सुरु केले. रणगाव येथील खंडकरी शेतकरी दत्तात्रेय जानबा साळुंके व विष्णू जानबा साळुंके या दोन भावाना गट नंबर १५,२३ व ३५ मध्ये प्रत्येकी २ एकर ५ गुंठे जमीन मिळाली आहे. शासानाने दोघांना जमीनीचा ताबा देताना मोजणी न करताच जमीन ताब्यात दिली. यामध्ये सुमारे २८ गुंठ्यामध्ये शेजारच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण असल्याने साळुंके यांना जमीन कमी मिळाली. अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या आठ वर्षापासुन दोघे बंधू बारामतीच्या प्रांतकार्यालय,इंदापूरच्या तहसील कार्यालय व शेतीमहामंडळाच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत.
यापूर्वी दोघांनी उपोषण ही केले होते. मात्र आश्वासनाशिवाय हातामध्ये काही न पडले नाही. पुन्हा शासन दरबारी हेलपाटे मारण्यास सुरवात झाली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला दोघा भाऊ कंटाळले असून त्यांनी १५ ऑगस्ट रोजी बारामती प्रांतकार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहार सर्व शासकीय कार्याकडे निवेदन पाठवून केला असून प्रांतकार्यालयासमोर आत्मदहन करण्यास रोखल्यास स्वत:च्या शेतामध्येच आत्मदहन करण्याचा इशारा दोन भावांनी प्रशासनला दिला आहे.
अतिक्रमण काढणार प्रांतधिकारी :
यासंदर्भात बारामतीचे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबधित शेतकऱ्यांना अतिक्रमण काढून देणार असून आत्मदहन करु नये असे सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.