राजीव गांधींचे नाव बदलणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान - प्रशांत जगताप

राजीव गांधी स्मारक समितीकडून खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नाव काढल्याच्या निषेधार्थ कात्रजमध्ये धरणे आंदोलन
prashant jagtap
prashant jagtapsakal
Updated on

कात्रज : खेलरत्न पुरस्कारातील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीचे (rajeev gandhi) नाव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान असल्याची टीका महविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी केली आहे. लोकशाही व संसदीय पध्दतीत असणारी मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे. यास काळही माफ करणार नाही, असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधीचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोरील पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (Removing Rajiv Gandhi name is insult national leadership prashant jagtap)

समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी यावेळी प्रास्ताविक भाषण केले. तिवारी म्हणाले, राजीव गांधींच्या संगणक व मोबाईल क्रांतीमुळेच कोरोना काळात देश तरला व ‘वर्क फ्रॅाम होम’ होऊ शकले, परंतू त्यांचे नांवे पुर्वीच्या काँग्रेस सरकार काळात सुरू केलेला राष्ट्रीय पुरस्कार मात्र मोदी सरकारने रद्द करून कृतध्नतेची पावतीच दिली आहे. यावेळी मा. महापौर अंकुश काकडे, काँग्रेस नेते श्रीरंग चव्हाण पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमूख गजानन थरकूडे यांनी मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वाप्रती अनादर व आकस स्पष्ट करणाऱ्या निंद्य कृतीचा निषेध केला. यावेळी सर्वांकडून भाजपविरोधी सरकार आल्यास पुन्हा या पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देऊन सन्मान करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.

prashant jagtap
कोथरूडच्या हरविलेल्या ८० वर्षाच्या आजी घरी पोचल्या

यावेळी महापालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धूमाळ, रविंद्र माळवदकर, मृणालीनी वाणी, निरंजन कुलकर्णी, अर्चना शहा, ओंकार पवार श्रीकांत शिरोळे, सुर्यकांत मारणे आदींनी मनोगत व्यक्त केले. निषेधाचे फलक, आजपर्यंत दिले गेलेले राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची यादी व राजीव गांधी यांचे क्रीडा व विकासातील योगदान विषयी माहीतीचे फलक यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. राष्ट्रगीत होऊन धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.