Video : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची आळंदीत पुनरावृत्ती? अल्पवयीन मुलाकडून महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पुण्यातील पोर्शे कारची (Pune Porsche Car Accident) पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडली.
Pune Porsche Car Accident Alandi
Pune Porsche Car Accident Alandiesakal
Updated on
Summary

अनेकजण जमिनी विकून चारचाकी गाड्या घेतात. लहान मुलांच्या हातात कमी वयात गाड्या आल्याने अशीच लहान वयातील मुले भरधाव वेगात गाड्या चालवित असल्याचे चित्र सर्रास आहे.

आळंदी : पुण्यातील पोर्शे कारची (Pune Porsche Car Accident) पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडली. विधीसंघर्षित सतरा वर्षीय मुलाने भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर जात जिवास हानी पोचविण्याचा प्रयत्न केला. आळंदी पोलिसांनी (Alandi Police) याप्रकरणी सतरा वर्षाच्या विधीसंघर्षित मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्याद वडगाव घेनंद येथील नाजुका रणजित थोरात यांनी दिली. ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी (ता. १५) घडलीये. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यात नुकतेच ताजे प्रकरण असलेल्या पोर्शे कार अपघात घटनेची पुनरावृत्ती असल्याची चर्चा नागरिक करत होते.

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव घेनंदमधील गणेश नगरमधे फिर्यादी नाजुका थोरात राहत आहेत. थोरात यांच्यासोबत विधीसंघर्षित मुलासोबतचा पूर्वी असलेल्या भांडणाच्या रागातून हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विधीसंघर्षित मुलाने त्याच्याकडील चारचाकी कार (एमएच १४, एचडी ५७४९) जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, थोरात बाजूला झाल्याने वाचल्या. थोडीशी दुखापत थोरात यांना झाली.

Pune Porsche Car Accident Alandi
खोटी कागदपत्रं देऊन 'बँक ऑफ इंडिया'ची 61 कोटी 15 लाखांची फसवणूक; भाजपच्या 'या' बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

तर, ज्या रस्त्यावरून विधीसंघर्षित बालकाने गाडी चालविली त्या रस्त्यावर आणखी पाच सहा नागरिक होते. त्यातील दोघांच्या हातात लाकडी दांडकेही होते. भांडणाचा प्रकार सुरू असताना विधीसंघर्षित बालकाने त्यांच्याकडील कार शंभर मीटर अंतर मागे नेली आणि पुन्हा त्याच वेगाने कार पुढे चालवून घटनास्थळी उपस्थित अन्य लोकांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यामधे एक वृद्ध व्यक्तीही होता. यावेळी भरधाव वेगात येणारी कार पाहून लोक बाजूला झाले, अन्यथा त्यांचीही काही खैर नव्हती.

कार पुढे घेऊन गेल्यानंतर या मुलाने कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला आणि थोरात यांच्याकडे पाहून शिवीगाळ करत होता. दरम्यान, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलिस ठाण्यात विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बालकाला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.

Pune Porsche Car Accident Alandi
Durgadi Fort : शिंदे-ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन; किल्ल्याजवळ तणावाचं वातावरण, काय आहे कारण?

आळंदी आणि परिसरात जमिनींना चांगले भाव आले आहेत. अनेकजण जमिनी विकून चारचाकी गाड्या घेतात. लहान मुलांच्या हातात कमी वयात गाड्या आल्याने अशीच लहान वयातील मुले भरधाव वेगात गाड्या चालवित असल्याचे चित्र सर्रास आहे. अडीच महिन्यांपूर्वी च-होलीमधे एका वाहतूक पोलिसालाही एका महाभागाने कार अंगावर घालून गंभीर जखमी केले होते. यामुळे लहान वयात गाड्या चालविणा-यांकडे पोलिसांनी कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.