मांजरी : येथील अमनोरा टाऊनशिपच्या गेटवे टॉवर या इमारतीच्या शिखरावर रविवारी (ता.26) प्रजासत्ताक दिनी जमिनीपासून सुमारे 550 फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बहुमजली उंच इमारतीवर अशा प्रकारचा तिरंगा ध्वज पहिल्यांदाच फडकविण्यात येत आहे.
हडपसर उपनगरात असलेल्या अमनोरा टाऊनशीपमधील ४५ मजली गेटवे टॉवरच्या शिखरावरील छतावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. शेवटच्या मजल्यावर ३० फूट उंचीच्या पोलवर ३० बाय २० फूट एवढ्या आकाराचा तिरंगा फडकविण्यात येणार आहे. शहराचे हे नवे आकर्षण ठरणार आहे.
याबाबत सिटी कार्पोरेशनचे उपाध्यक्ष सुनील तरटे म्हणाले, "सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांची ही मूळ कल्पना आहे. गेटवे टॉवरच्या ४५ व्या मजल्यावर ३० फूट उंचीचा लोखंडी खांब लावण्यात आला आहे. त्यावर हा तिरंगा फडकविण्यात येणार आहे. २६ जानेवारीला सकाळी त्याचे ध्वजारोहण होईल. सर्वात उंचीवर देशाचा राष्ट्रध्वज फडाकावताना मोठा अभिमान वाटत आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.