पुणे- सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक लोकांना माहिती असून देखील छोट्याशा आमिषाला बळी पडतात आणि स्वत:चे पैसे गमावून बसतात. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. पुण्यात एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. ७० वर्षाच्या महिलेकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे घेण्यात आले. पण, तिची फसवणूक करण्यात आली आहे.
सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे महिलेने बँकेत ठेवले होते. महिलेला एक मोबाईलवर मेसेज मिळाला होता. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर महिलेने बँकेत जमा केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी संबंधित व्यक्तींकडे दिले. त्यानंतर महिलेची तब्बल २.८५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Retired woman officer in Pune was misled 2.85 crores of retirement money lost)
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलेला चांगला परतावा मिळाला. विश्वास बसल्याने महिलेने हळूहळू सर्वच रक्कम आरोपींना दिली. पण, त्यानंतर महिलेला परतावा मिळणे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला हनुमाननगरची राहणारी आहे
सायबर फसवणुकीची वेगवेगळी प्रकरणे आपल्या समोर येत आहेत. प्रत्येकवेळी आरोपी वेगवेगळ्या पर्यांयाचा अवलंब करत आहेत. लोकांमध्ये प्रबोधनाची कमतरता असल्याने अनेकजण याला बळी पडत असतात. व्हिडिओला लाईक करणे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे, ऑनलाईन फ्रेंडच्या माध्यमातून फसवणूक अशी प्रकरणे समोर आली आहे. छोट्याशा आमिषाला बळी पडल्याने लोकांची मोठी फसवणूक केली जाते. यासाठी लोकांची जागृक असणे आवश्यक आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.