Pune Crime : ‘भाई’च्या खुनाचा बदला! टोळक्याने तरुणावर केले कोयत्याने वार; वाहनांची केली तोडफोड

टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना येरवडा परिसरात घडली.
Murderer Attack
Murderer Attackesakal
Updated on

पुणे - ‘भाई’च्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच, वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना सोमवारी मध्यरात्री येरवडा परिसरात घडली.

या प्रकरणी प्रवीण भगवान कांबळे (वय ३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश ऊर्फ गोट्या चंद्रकांत मोरे (रा. पाषाण) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सतीश मोरे या संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात सुधीर गवस (वय २५, रा. जयप्रकाश नगर, येरवडा) याचा १७ जुलै रोजी मध्यरात्री खून केला होता. फिर्यादी प्रवीण कांबळे सोमवारी मध्यरात्री माऊली चौक ते महिंद्रा सोसायटीदरम्यान शतपावली करत होते. त्यावेळी चौघेजण कोयते घेऊन आले.

‘आमचा भाई सुधीर गवसच्या खुनाचा बदला घेणारच, जो मध्ये येईल त्याला संपवून टाकू’, असे म्हणत टोळक्याने कोयत्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी आणि रिक्षांची तोडफोड केली. त्यानंतर प्रवीणवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, येरवडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.