Richard Roberts : बीटी’ बियाणांना विरोध का?

नोबेल विजेते शास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड रॉबर्ट्स यांचा प्रश्न; पुणे दौऱ्याला सुरवात
Richard Roberts
Richard Robertssakal
Updated on

पुणे : निसर्गतःच जीवसृष्टीत झालेले अनेक जनुकीय बदल आपण पाहिले आहे. त्यामुळे आजवर कोणतीही परिसंस्था धोक्यात आल्याचे माझ्या ऐकिवात नाही. असे असताना जनेटीकली मॉडिफाइड ऑर्गेनिझम (जीएमओ) अर्थात बीटी बियाणांना विरोध का, असा प्रश्न नोबेल पुरस्कार विजेते शास्रज्ञ प्रा. सर रिचर्ड जे रॉबर्ट्स यांनी उपस्थित केला.

दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असलेल्या प्रा. रिचर्ड यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेत (एनसीसीएस) जाहीर व्याख्यान दिले. तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, एनसीसीएसचे संचालक डॉ. मोहन वाणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी उपस्थित होते.

प्रा. रिचर्ड म्हणाले, ‘‘जीएमओ पिकपद्धतीमुळे विकसनशील देशांना अन्न सुरक्षा प्रदान करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाला किंवा संबंधित परिसंस्थेला कोणतीच धोका पोचलेली नाही. उलट रोगांपासून बचाव ते माणसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वे जीएमओ पिकपद्धतीमुळे देता येणार आहे. जगभरात होत असलेला विरोध हा अशास्त्रीय असून, सरकारने यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.’’ भारत सरकारने नुकतेच बीटी-मोहरीच्या वाणाला परवानगी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पुणे दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी प्रा. रिचर्ड यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले, तसेच विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागातील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी प्रा.रिचर्ड यांना गराडा घातला. गुरुवारी ते फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

सामाजिक कार्यासाठी आम्ही एकवटलो....

नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अचानक सर्व लोक आमचे ऐकू लागले. आमच्या बोलण्याला सर्वच क्षेत्रात दखल घेण्यात आली. म्हणून अशा नोबेल विजेत्या १२० शास्रज्ञांची समिती केली असून, समाजाच्या भल्यासाठीच्या कामासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. म्हणूनच आम्ही लिबीयातील नर्सेसला मुक्त करू शकलो, अशी माहिती प्रा. रिचर्ड यांनी दिली.

नोबेल विजेता शास्रज्ञ पुण्यात आल्यावर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही प्रोत्साहन मिळते. कोरोना काळानंतर असा प्रसिद्ध शास्त्रज्ञ पुण्यात आल्याने निश्चितच वैज्ञानिक समुदायात आनंदाचे वातावरण आहे.

- डॉ. शेखर मांडे, माजी महासंचालक, सीएसआयआर, दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.