मोहात अडकला रिक्षाचालक, महिलेने घातला पावणे दोन लाखांना गंडा

25 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष महिलेने ऑनलाईन माध्यमाद्वारे दाखविले. साहजिकच या मोहात रिक्षाचालक अडकला.
Online fraud
Online fraudsakal
Updated on
Summary

25 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष महिलेने ऑनलाईन माध्यमाद्वारे दाखविले. साहजिकच या मोहात रिक्षाचालक अडकला.

पुणे - फायनान्स कंपनीने जादा व्याजदराने कर्ज दिल्यामुळे रिक्षाचालकाने संबंधित कंपनीला कर्ज परत केले. त्याचवेळी अवघ्या एक टक्का इतक्‍या दराने 25 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष एका महिलेने ऑनलाईन माध्यमाद्वारे दाखविले. साहजिकच या मोहात रिक्षाचालक अडकला, आणि बघता बघता महिलेने रिक्षा चालकाला पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला.

याप्रकरणी गुलटेकडी येथे राहणाऱ्या एका 55 वर्षीय रिक्षाचालकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम ठेकेदार व रिक्षाचालक आहेत. त्यांनी 2021 मध्ये वाहनांसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या एका नामांकीत फायनान्स कंपनीकडून एक लाख 36 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र संबंधित कंपनीचा व्याज दर जास्त होता. त्यामुळे त्यांच्या खात्यावर बॅंकेने जमा केलेल्या रकमेचा धनादेश त्यांनी संबंधित फायनान्स कंपनीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात जाऊन परत केला. दरम्यान, 29 ऑक्‍टोबर 2021 या दिवशी फिर्यादी रिक्षाचालकाच्या मोबाईलवर रिहाना शर्मा नावाच्या महिलेने संपर्क साधला.

आपण फायनान्स कंपनीमधून बोलत आहोत, 'आम्ही तुम्हाला एक टक्के व्याजदराने 25 लाख रुपये कर्ज देऊ शकतो' असे आमिष दाखविले. संबंधित महिलेच्या बोलण्यावर फिर्यादीने विश्‍वास ठेवला. त्यानंतर कर्जासाठी लागणारी आवश्‍यक कागदपत्रे तिला व्हॉटसअपद्वारे पाठविली. त्यानंतर त्यांनी प्रक्रिया शुल्क म्हणून प्रारंभी सात हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस कर्जाचे तीन हप्ते अगोदरच भरावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 21 हजार रुपये असे 21 हजार रुपये, तर विम्यासाठी 30 हजार रुपये घेतले. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी फिर्यादीकडून एक लाख 79 हजार 642 रुपये इतकी रक्कम घेतली. त्यानंतरही कर्ज मिळाले नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

अशी घ्या काळजी

- अनोळखी व्यक्तींच्या फोन, ईमेल, व्हॉटसअप लिंक, मेसेजला प्रतिसाद देऊ नका

- अनोळखी व्यक्तींबरोबर ऑनलाईन आर्थिक व्यवहार करु नका

- मोफत किंवा अल्प दराज कर्ज किंवा भेटवस्तुच्या आमिषाला बळी पडू नका

- स्वतःची गोपनीय माहिती, कागदपत्रे इतरांना देऊ नका

- फसवणुक होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

इथे साधा संपर्क

* सायबर पोलिस व्हॉटस्‌अप क्रमांक - 7058719371, 7058719375

* सायबर पोलिस ठाणे - 020-29710097

* ई-मेल - crimecyber.pune@nic.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.