Katarj : कुत्र्यांचा वाढला चावा, सांभाळून जावा...२५ हजारांहून अधिक नागरिक जखमी

Katarj : पुणे शहरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्याचे प्रमाण वाढले असून मागील वर्षभरात २५ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या तातडीच्या बंदोबस्ताची मागणी वाढत आहे.
Dog Bites
Dog Bites in Punesakal
Updated on

कात्रज : शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना चावा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षभरात शहरातील जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

दर महिन्याला कुत्र्यांनी चावल्याची संख्या ही २ हजारांवर आहे. मे महिन्यात तर ही संख्या तीन हजारांच्या जवळ पोहोचली असून, तब्बल २ हजार ८३९ नागरिकांना चावा घेतल्याच्या नोंदी झाली आहेत. मात्र शहरात एवढ्या घटना घडूनही महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्यांमध्ये लाल पाणी भरून त्या गेटवर बांधण्याची शक्कल लढवली आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. भटकी कुत्री रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर भुंकतात. त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहेत. तसेच ते कुठेही घाण करत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटना

महिना चावा घेतलेले नागरिक

  • एप्रिल २०२३...१६८७

  • मे १८३६

  • जून २०२३

  • जुलै २१३७

  • ऑगस्ट २४२८

  • सप्टेंबर २३००

  • ऑक्टोबर २५१३

  • नोव्हेंबर २०८९

  • डिसेंबर १९७१

  • जानेवारी २०२४... १९७३

  • फेब्रुवारी २०९३

  • मार्च १९६१

  • एप्रिल १९२०

  • मे २८३९

  • जून २१९९

  • जुलै २०१२

  • ऑगस्ट १९३७

भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही त्रास होतो. रस्त्यांवर घाण होऊन दुर्गंधी सुटते. याकडे कुत्र्याचे मालक सर्सास दुर्लक्ष करतात. यात प्राणी दया, माणुसकीबरोबर नागरिकांच्या जीवाला किती धोका आहे, याकडे कोणीही पाहत नाही.

- सचिन कुलकर्णी, नागरिक

भटक्या कुत्र्यांना सरसकट पकडून घेऊन जावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु तसे करता येत नाही. त्यांना डांबून ठेवता येत नाही, मारता येत नाही. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे नियम महापालिकेला पाळावे लागतात. नागरिकांची तक्रार आल्यास त्या श्नानाला जवळच्या सेंटरमध्ये दहा दिवस ठेवून त्याचे लसीकरण करतो. कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रत्येक परिमंडळाच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून उपाययोजना केल्या जात आहेत.

- डॉ. नयना बोराडे, मुख्य आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.