Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका

Share-Auto
Share-Auto
Updated on

पिंपरी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, शहरात धावणाऱ्या शेअर रिक्षामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी  काही दिवस शेअर ऑटोवर निर्बंध घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम, विरंगुळा केंद्रे, उद्याने आदी बंद ठेवण्यात आली आहेत. एकूणच गर्दीच्या ठिकाणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, लोकल सेवा, बस बंद केली आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांनी रिक्षाला प्राधान्य दिले जात असल्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी सोयीच्या ठरणाऱ्या आॅटो रिक्षांचा व्यवसाय  तेजीत आल्याचे दिसून आले आहे.

शहरात काही मार्गावर शेअर ऑटो धावतात. यातून एका वेळी तीन ते चार प्रवासी वाहतूक केली जाते. आरटीओच्या संमतीने शेअर्स ऑटोचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. शहराच्या उपनगरात अशाप्रकारे शेअर्स ऑटोचे अनेक मार्ग आहेत. परवडत नसल्याने रिक्षा चालकांनी चार ते पाच प्रवासी कोंबतात. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.