Pune News : धामणी वनविभाग पाझरतलावातील पाणी उपसा करत असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईचा धोका

धामणी ता. आंबेगाव येथील वरचा बढेकरमळा येथील पाझरतलावालगत वनविभागाने खोल खड्डा घेऊन झाडांसाठी मोटारीने पाणी उपसा करत आहे त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत चालले आहे
risk of shortage drinking water in summer forest department Dhamani pumping water
risk of shortage drinking water in summer forest department Dhamani pumping water sakal
Updated on

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील वरचा बढेकरमळा येथील पाझरतलावालगत वनविभागाने खोल खड्डा घेऊन झाडांसाठी मोटारीने पाणी उपसा करत आहे त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत चालले आहे त्यामुळे परिसरातील विहिरींचीही पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

वातावरणात उष्णता वाढू लागली आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे वनविभागाने तलावातील पाणी उपसा करू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

येथील वरचा बढेकरमळ्याच्या वरच्या बाजूला जिल्हा परिषदेने पाझर तलाव केला आहे त्यामध्ये पावसाचे पाणी साचून आसपासच्या विहिरींची पाणी पातळी वाढत आहे. हा परिसर दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणी टंचाई असते. नागरिक विहिरींच्या पाण्यावर कशीबशी पिण्याच्या पाण्याची सोय करत असतात.

दोन वर्षापासुन वनविभागाने या पाझरतलावाच्या लगत खोल खड्डा घेतला असून तेथे मोटार बसवून त्यातील पाणी डोंगरावर केलेल्या शेततळ्यात सोडून ते पाणी झाडांना दिले जाते. परंतु या भागात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला असुन वातावरणात उष्णता वाढू लागली आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावणार आहे.

वनविभाग मोटारीने पाणी उपसा करत असल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत चालले आहे त्यामुळे परिसरातील विहिरींचीही पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे त्यामुळे येथील पाणी उपसा करू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जवळूनच डिंभा धरणाचा उजवा कालवा जातो वनविभागाने कालव्यातील पाणी मोटारीने उपसा करू झाडांसाठी तयार केलेल्या शेततळ्या मध्ये सोडू शकतात अशी माहितीही स्थानिक नागरिकांनी दिली आहे

यांसदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले स्थानिक नागरिकांच्या सहमतीनेच वनविभाग झाडांसाठी पाणी घेत होते स्थानिक नागरिकांची मागणी असेल तर आम्ही तेथील पाणी उपसा करणार नाही झाडांच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करू उद्या गुरुवार (दि.०८) रोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार असल्याचे स्मिता राजहंस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.