Riya Pawar : पुण्याचा आवाज घुमणार अमेरिकेमध्ये; रिया पवार नरेंद्र मोदींच्या समोर सादर करणार अमेरिकन राष्ट्रगीत

पुण्यातील पवार कुंटूबातील १६ वर्षाची रिया राहुल पवार अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर करणार.
Riya pawar
Riya pawarsakal
Updated on

वालचंदनगर - पुण्यातील पवार कुंटूबातील १६ वर्षाची रिया राहुल पवार अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर करणार असून पुण्याचा आवाज अमेरिकेमध्ये घुमणार आहे.

पुण्यातील रास्ता पेठमधील श्रद्धा राहुल पवार-भोसले व राहुल सुरेश पवार हे अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहेत. श्रद्धा पवार-भोसले ही वालचंदनगरचे कै. विठ्ठल भोसले व मंगल भोसले यांची मुलगी आहे.

कै. विठ्ठल भोसले हे वालचंदनगर कंपनीमध्ये कामाला होते. मंगल भोसले या कळंब मधील वालचंद विद्यालय व वर्धमान विद्यालयामध्ये शिक्षीका म्हणून कार्यरत होत्या. कै. विठ्ठल भोसले यांनी वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या कामगार संघटनेमध्ये खजिनदार पदावरती काम केले आहे.

२०११ मध्ये त्यांचा हद् य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मुलगा संदिप भोसले हा इंजिनिअर असून २००१ पासुन अमेरिकेमध्ये आहे. राहुल पवार यांच्यासोबत झालेल्या विवाहानंतर २००१ पासुन श्रद्धा पवार-भोसले या ही अमेरिकेमध्ये राहत आहे.

श्रद्धा पवार- भोसले ही इंजिनिअर आहे. तसेच राहुल पवार, पत्नी श्रद्धा, मुलगी रिया व मुलगा रिशान अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहे. श्रद्धाची आई मंगल भोसले ही सध्या अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहतात.

Riya pawar
International Yoga Day : चार पिढ्यातील महिलांनी एकत्र साजरा केला योग दिन

रिया पवार ही श्रद्धा भोसले यांची नात असून रियाला तिच्या आई व आजीमुळे वालचंदनगर विषयी प्रेम आहे. १६ वर्षाची रियाचा आवाज सुंदर असून तिला गाण्याची आवड आहे. वयाच्या पाच वर्षापासुन रिया गाणी गात आहे.

मूळ भारतीय वंशाची अमेरिकन असणारी, रिया ला भारतीय संस्कृतीची आवड असून मराठी ही उत्तम बोलते. तसेच ती भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षणाचे धडे ही गिरवत असून बॉलीवूड आणि वेस्टर्न संगीतही शिकते आहे.

रियाने तिन्ही प्रकारात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने 'मिस इंडिया टीन न्यू जर्सी'चा किताब २०२१ साली पटकावला आहे. २३ जून रोजी वॉशिंग्टन डी.सी. मधील रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये अनिवासीय आणि भारतीय वंशज (इंडियन डायस्पोरा) यांच्या कार्यक्रमादरम्यान रिया पवार हिला नरेंद्र मोदी यांच्या समोर अमेरिकन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी तसेच राष्ट्रगीत गाण्यासाठी रिया खूप उत्सुक आहे.

Riya pawar
Sopankaka Palkhi : ...अखेर सोपानकाकांची पालखी बारामती शहरात सुखरूप पोचली

माझ्या अमेरिकन आणि भारतीय अस्तितवाच्या दोन्ही बाजू या निमिताने एकत्र आलेल्या पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर राष्ट्रगीत सादर करण्यासाठी उत्सुक असल्याचे रिया पवार हिने सांगितले.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी उत्सुक असून रियाला राष्ट्रगित गाण्याची मिळाली संधी आमच्या कुंटूबासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याचे रिया ची आजी मंगल भोसले यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

यासंदर्भात रियाची आई श्रद्धा पवार-भोसले हिने सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. भारताच्या प्रगतीसाठी मोदीजी काय करत आहेत हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()