पर्वती दर्शन येथील सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे रस्ता वाहतुकीस बंद

नियमाने येथील कामा संदर्भातील फलक ठेकेदारांनी लावणे बंधनकारक आहे मात्र कोणताही प्रकारे नियमाचे व कामा संदर्भातील फलक लावले नाहीत.
पर्वती
पर्वती sakal
Updated on

सहकारनगर : सातारा रस्ता पर्वती दर्शन साई बाबा मंदिर समोरील वस्ती मधील सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू असल्याने स्वारगेट, लक्ष्मी नारायण टॉकीज, सारसबाग, सिंहगडकडे जाण्यासाठी उड्डाणपूल वरून जावे लागत आहे. नियमाने येथील कामा संदर्भातील फलक ठेकेदारांनी लावणे बंधनकारक आहे मात्र कोणताही प्रकारे नियमाचे व कामा संदर्भातील फलक लावले नाहीत.परिणामी उड्डाणपूल जवळ आल्यावरच सर्व्हिस रस्ता बंद असल्याचे वाहनचालकांना दिसते.

पर्वती
खंडणी वसुल करणा-या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन मंजूर

संबंधित ठेकेदारांनी किमान पंचमी चौकात तरी कामा संदर्भातील फलक लावणे गरजेचे आहे.असे फलक न लावल्याने नागरिकांना याठिकाणी आल्यानंतर समजते काम सुरू आहे.त्यानंतर परत वाहनांना बीआरटी मार्गातून जावे लागत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहे.यावेळी संतोष पाटोळे म्हणाले, सातारा रस्ता उड्डाणपूल जवळच पर्वती दर्शन साई बाबा झोपडपट्टी असल्याने सर्व्हिस रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून संतगतीने काम सुरू आहे.सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी पूर्णता बंदच असल्याने

स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कात्रज कडून येणाऱ्या वाहनांना स्वारगेट,सिंहगड, लक्ष्मीनारायण थिएटरकडे जाण्यासाठी  नाईलाजास्तव बीआरटी मार्गातून वाहने घालावी लागतात.परिणामी याठिकाणी अपघात होत आहेत. तसेच  वस्तीतून सातारा रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना पंचमीपर्यंत विरुद्ध दिशेने जावे लागते.

पर्वती
आरोपी रविंद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकीलास अटक

वाहन चालकांना धोकादायक पद्धतीने वाहने वळवावी लागत असल्याने याठिकाणी अपघात होत आहेत.येथील कामा संदर्भात ठेकेदार व मनपा पथ विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नसून कामा संदर्भातील फलक ही लावला नाही. यामुळे संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

पर्वती
दगडूशेठच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार अरुणाचल प्रदेश आणि पठाणकोटमध्ये !

यावेळी अमर शिंदे (कार्यकारी अभियंता पथ विभाग) म्हणाले, सातारा रस्त्यावरील उड्डाणपूल खालील सर्व्हिस रस्ता खराब झाल्याने पथ विभाग मार्फत काम सुरू करण्यात आले आहे.सर्व्हिस रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.ठेकेदारांना याठिकाणी कामाच्या तपशिलाचा फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंधरा दिवसांत काम पूर्ण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.