Highway News: पुणे सोलापूर महामार्गाने अनेक वर्षांनी घेतला मोकळा श्वास

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार तुपे यांचा पुढाकार
Highway News:
पुणे सोलापूर महामार्गाने अनेक वर्षांनी घेतला मोकळा श्वासsakal
Updated on

Hadapsar News: पुणे सोलापूर महामार्गावर धावणाऱ्या खाजगी प्रवासी बसेससाठी शेवाळवाडी येथील पीएमपीएल बस डेपोच्या आवारात प्रतीक्षा थांबा देण्यात आला आहे.

त्यामुळे गेली कित्येक वर्षापासून रात्रीच्या वेळी होणारी मोठी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन परिसरातील महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.

आमदार चेतन तुपे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला असून थेट रस्त्यावर उतरून त्यांनी या बदलाबाबत प्रवासी वाहनांना व प्रवाशांना सूचना दिल्या आहेत.

Highway News:
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील 'हा' मार्ग बनलाय 'डेंजर झोन'; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

पुणे - सोलापूर महामार्गावरून दररोज रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत लातूर, धाराशिव, सोलापूर आदी भागात जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसचा मोठा राबता आहे. शहर व हडपसर परिसरात या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे दररोज सत्तर - ऐंशी खाजगी बसेस काळुबाई चौक, मगरपट्टा, हडपसर, गाडीतळ, रवी दर्शन, आकाशवाणी केंद्र, मत्स्यबीज केंद्र, शेवाळवाडी आदी ३१ ठिकाणी मनमानी पद्धतीने प्रवासी घेण्यासाठी उभ्या रहात असतात. शनिवार रविवार व इतर सुट्ट्यांच्या काळात बसची ही संख्या शेकडोच्या घरात असते.

एकाच वेळी मोठ्या संख्येने या बसेस रस्त्यावर येऊन उभ्या राहत असल्याने इतर प्रवाशांना दररोज मोठ्या कोंडीशी सामना करावा लागतो. नोकरदार व्यवसायिक विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागतो महामार्ग लगतच्या सोसायटी धारकांनाही प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

या बसेस साठी प्रवाशांचे बुकिंग घेणाऱ्या एजंटांनी ठिकठिकाणी आपली कार्यालये सुरू केली आहेत. या कार्यालयांसमोर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची वाहने, त्या शेजारी एका आड एक उभ्या असलेल्या प्रवासी बसेस यामुळे महामार्गावर केवळ एकेरी वाहतूक करावी लागते. पोलिस प्रशासनाकडूनही त्याकडे डोळेझाक होत असल्याने दिवसेंदिवस कोंडी वाढतच आहे. याबाबत प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या.

Highway News:
National Highway : 'या' महामार्गासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; चौपट दरासाठी अडले महामार्गाचे घोडे

दरम्यान, आमदार चेतन तुपे पाटील यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. वाहतूक पोलीस प्रशासनालाही धारेवर धरले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही खासगी प्रवासी बसेससाठी शेवाळवाडी बस डेपोतील काही जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पालिका, पीएमपीएल, वाहतूक पोलिस प्रशासनाशी चर्चा करून अखेर शेवाळवाडी बस डेपोतील जागा खाजगी प्रवासी बसेसच्या प्रतीक्षा थांबण्यासाठी मिळविण्यात त्यांना यश आले आहे.

सोलापूर महामार्गावरील येणाऱ्या या बसेस व प्रवाशांच्या माहितीसाठी ठीक ठिकाणी नवीन थांब्याबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत आमदार तुपे पाटील व वाहतूक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे आपले कर्मचारी व काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन थेट रस्त्यावर उतरत गेली दोन दिवसापासून या बदलांबाबत प्रबोधन करीत आहेत.

या कार्यवाहीमुळे हडपसर परिसरातील सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत झाली आहे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. "हडपसर परिसरातील सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी प्रवासी बसेसचे येथील थांबे बंद करणे गरजेचे होते. त्याबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या होत्या. हे सर्व थांबे आता शेवाळवाडी येथील बस डेपोच्या आवारात हलविण्यात आले आहेत.

बस चालक व येथे येणाऱ्या प्रवाशांनी आता थेट शेवाळवाडी येथील बस डेपोच्या आवारात जावे. या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी, लाईट आधी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील. परिसरातील सोसायटीतील व इतर नागरिकांनी वेळोवेळी येथे येणारे प्रवासी व बसचालकांना या बदलाची माहिती द्यावी.'

चेतन तुपे पाटील, आमदार, हडपसर विधानसभा

"यापुढे हडपसर परिसरातील पुणे सोलापूर महामार्गावर खासगी बसेस प्रवासी घेण्यासाठी थांबणार नाहीत. त्यांनी यापुढे शेवाळवाडी पीएमपीएल बस डेपोच्या आवारातच प्रवासी घ्यावेत. महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी बस थांबल्यास कडक कारवाई करण्यात येईल.'

कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा हडपसर
Highway News:
Paitha Pandharpur Highway : पैठण-पंढरपूर मार्ग त्वरित पूर्ण करा ; खंडपीठात याचिका ,केंद्रासह प्रतिवादींना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.