सलग 3 दिवस सुरु असलेले रिपाइंचे उपोषण तात्पुरते स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

RPI fast was temporarily suspended after a written assurance from the Collector
RPI fast was temporarily suspended after a written assurance from the Collector
Updated on

गराडे : पदवीधर शिक्षक विधानपरिषदेच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने घेतलेल्या सासवड येथील मेळाव्यात भिवडी केंद्राचे केन्द्र प्रमुख राजेंद्र जगताप यांनी राजकीय व्यासपीठावरून मतदारांना आवाहन केले. त्यामुळे आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी पुरंदरचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या कडे केली होती. 

बरेच दिवसाची दिरंगाई होऊन देखील प्रशासन संबंधितांवर कारवाई करीत नसल्यामुळे आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी उपोषण केले होते. आज जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सलग तीन दिवस सुरु असलेल्या उपोषणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याने हे उपोषण तातपुरते स्थगित केले.

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​

जिल्हाधिकारी राजेश देशमख व मुख्यधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी फोनवरून झालेले बोलणे व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तसेच प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी स्वत: जिल्हाधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने दिलेले कार्यवाहीचे पत्र यामुळे सदरचे उपोषण काही दिवसासाठी स्थगित करीत असल्याचे उपोषणकर्ते पंकज धिवार यांनी सांगितले.
 
प्रशासन अतिशय निर्दयी आहे,आम्हाला या कडाक्याच्या थंडीत उपोषणास तीन दिवस बसवलं. उपोषनापासून परावृत्त करण्याकरिताची विनंती करण्यासाठी तहसीलदार रुपाली सरनोबत या आल्या होत्या. त्यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले असल्याचे युवाध्यक्ष स्वनिल कांबळे यांनी सांगितले.

धुमशान ग्रामपंचायतीचं : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार बेनके​

यावेळी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व गोपनीय विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कडू, मुजावर लतीफ आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष पंकज धिवार, युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे, एकनाथ कांबळे, प्रतीक धिवार, स्वप्नील घोडके दीपक वाघमारे आदी कार्यकर्ते उपोषणास बसले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.