Pune News : आरटीआय कार्यकर्त्याला माजी नगरसेविकेने चपलेने चोपले

वसतिगृहाच्या निविदेचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे या सायंकाळी महापालिकेतील भवन विभागात आल्या होत्या.
Beating
BeatingSakal
Updated on

पुणे - महापालिकेतर्फे बाणेर येथे आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्याचे काम सुरु असताना या कामाच्या निविदेबाबत तक्रारी करून अडथळा निर्माण करून उद्धट वर्तन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा खास व माहिती अधिकारात पटाईत असलेल्या कार्यकर्त्याला भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेत चपलेने चोप दिला. या ‘वजनदार’ कार्यकर्त्याला महिला नगरसेविकेने मारहाण केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.