Pune News : वाहनचालकांनी सात दिवसांत भरले ४१ लाख रुपये तडजोड शुल्क

वाहतूक शाखेच्या आवाहनास नागरिकांकडून प्रतिसाद
rto traffic police paid compromise fee of Rs 41 lakh in seven days transport department
rto traffic police paid compromise fee of Rs 41 lakh in seven days transport departmentsakal
Updated on

पुणे : वाहतूक शाखेच्या येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सुरू केलेल्या मदत कक्षाला (हेल्पडेस्क) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सात दिवसांत वाहनचालकांनी १ हजार ७९८ वाहनचालकांनी ४१ लाख रुपयांहून अधिक तडजोड शुल्क भरले आहे.

झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे, सिग्नलचे उल्लंघन, हेल्मेट परिधान न करणे, सीटबेल्ट न बांधणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष आणि सीसीटीव्हीद्वारे ही कारवाई केली जाते.

rto traffic police paid compromise fee of Rs 41 lakh in seven days transport department
Pune News : सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र सहकार विकास मंडळ मदत करणार; मिलिंद आकरे

परंतु अनेक वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही. त्या वाहनचालकांना तडजोड करून शुल्क भरता येणार आहे. वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात २८ ऑगस्टपासून ‘हेल्पडेस्क’ सुरू केला आहे.

वाहनचालकांनी चलन आणि आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीसह ‘हेल्पडेस्क’शी संपर्क साधावा. या अभियानास वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा हेल्पडेस्क आठ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा.

वाहनचालकांकडे ३० कोटी रुपये थकीत

एक जानेवारीपासून ३१ ऑगस्ट २०२३ अखेर वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा लाख ९९ हजार ८७९ वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांना ४४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

त्यापैकी दोन लाख ४८ हजार २४० वाहनचालकांनी १४ कोटी २२ लाख ६९ हजार रुपये दंडाची रक्कम भरली आहे. उर्वरित चार लाख ५१ हजार ६३९ वाहनचालकांकडे सुमारे ३० कोटींहून अधिक दंडाची रक्कम थकीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()