कायम परवान्यासाठी आरटीओचे आज, उद्या कामकाज सुरू राहणार

RTO-Office-Pune
RTO-Office-Pune
Updated on

पुणे - शहरात सहा हजार नागरिक कायम परवान्याच्या (पर्मनंट लायसन्स) प्रतीक्षेत असून तो मिळण्यासाठी त्यांना पुढील तारीख उपलब्ध होत नाही. अशा उमेदवारांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुटीच्या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.

येत्या शनिवारी (ता. 23) आणि रविवारी (ता.24) फक्त हलके मोटार वाहन या वर्गाच्या कायम परवान्यासाठीचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता कायम परवान्याचा कोटा मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी फी भरलेली आहे. परंतु, कोटा उपलब्ध झालेला नाही अशा उमेदवारांनी पूर्वनियोजित वेळ व तारीख घ्यावी व चाचणीसाठी भोसरी येथील आयडीटीआर येथे हजर राहावे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

कायम परवाना मिळण्यासाठी अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुटीच्या दिवशी कामकाज करावे, अशी मागणी शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.