रुपीच्या प्रशासकांकडून रिझर्व्ह बॅंकेला तीन पर्यायांचा प्रस्ताव

रुपी को-ऑप. बॅंकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकर परत मिळाव्यात, यासाठी बॅंकेच्या प्रशासकांकडून रिझर्व्ह बॅंकेला दिलेल्या प्रस्तावात तीन पर्याय सुचविण्यात आले आहेत.
RBI
RBISakal
Updated on

पुणे - रुपी को-ऑप. बॅंकेच्या (Rupee Cooperative Bank) ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकर परत मिळाव्यात, यासाठी बॅंकेच्या प्रशासकांकडून रिझर्व्ह बॅंकेला (Reserve Bank) दिलेल्या प्रस्तावात (Proposal) तीन पर्याय सुचविण्यात आले आहेत. सक्षम बॅंकेत विलीनीकरण, लघुवित्त बॅंकेत रूपांतर आणि बॅंकेचे पुनरुज्जीवन असे तीन पर्याय आहेत. याबाबत येत्या तीन-चार महिन्यांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी सुधारित ठेव विमा कायदा नुकताच पारित केला आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेस निर्देश दिल्यानंतर वैधानिक बाबींची पूर्तता करून पाच लाखांपर्यंतच्या ठेवी बँकेस ठेवीदारांना परत कराव्या लागतील. परंतु पाच लाखांहून अधिक ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. रिझर्व्ह बँकेने तीनपैकी कोणताच पर्याय मान्य न केल्यास चार हजार ठेवीदारांचे ३७० कोटींचे नुकसान होऊ शकते.

RBI
खंडणी उकळणा-या पोलिस उपनिरीक्षकाला अटक

यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार रुपी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव दिला होता. परंतु रिझर्व्ह बॅंकेने तो नुकताच नाकारला आहे. त्यानंतर रुपीचे बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशीही मागणी पुढे आली. परंतु याबाबत सकारात्मक चर्चा अद्याप पुढे सरकलेली नाही.

बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रुपी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेला तीन पर्याय सुचविले आहेत. कोणताही पर्याय स्वीकारताना पाच लाखांहून अधिक ठेवी असणाऱ्या ठेवीदारांनी सहकार्य देणे त्यांना क्रमप्राप्त आहे. बँकेने त्यासाठी ठेवीदार संपर्क मोहीम सुरु केली असून, ठेवीदारांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. बँकेचे ऋण नक्त मूल्य वगळता लेखापरिक्षण अहवालात गंभीर स्वरूपाचा शेरा नाही. बँकेचे माजी दोषी संचालक आणि अधिकारी यांच्या अपिलावरील निर्णय लवकर जाहीर करण्यासाठी बँक सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. गेल्या आठ वर्षांत तीनशे कोटी रुपये कर्जवसुली करण्यात आली आहे. बँकेने सातत्याने सलग पाच वर्षे परिचलनात्मक नफा मिळवला असून, तो ७० कोटींहून अधिक आहे.’

RBI
पुणे: गुरुवारी १९५ ठिकाणी होणार लसीकरण

बँक अवसायनात गेल्यास ३७० कोटींच्या ठेवी बुडणार

रिझर्व्ह बॅंकेने तीनही पर्यायांना मान्यता न दिल्यास बॅंक अवसायनात जाऊ नये, यासाठी केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे बँकेचा प्रश्न प्रशासकांनी मांडला आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या चार लाख ९६ हजार आहे. त्यांच्या ठेवी परत मिळणे शक्य होणार आहे. परंतु बॅंक अवसायनात गेल्यानंतर पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या ३७० कोटींच्या ठेवी बुडतील. त्यामुळे बॅंक अवसायनात काढण्याऐवजी विलीनीकरणासह तीन प्रमुख पर्यायांवर विचार व्हावा, यासाठी बँक रिझर्व बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

रुपी बॅंकेची मार्च अखेरची स्थिती

  • ठेवी : १२९६ कोटी ७३ लाख रुपये

  • कर्जे : २९४ कोटी १५ लाख रुपये

  • हार्डशिप योजनेंतर्गत दिलेली रक्कम : ३७१ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.