तळेगाव ढमढेरे : कोविडची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, सरकार सर्वोत्परी मदत करील, नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाविषयी आयोजित केलेल्या ३९ गावातील आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. पुण्यातील बैठकीत झालेल्या चर्चाविषयी माहिती सांगण्यासाठी रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे रविवारी आंबेगाव- शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
पुणे येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, महादेव घुले, आंबेगाव- शिरूर विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, युवा नेते राजेंद्र गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तहसीलदार लैला शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे आदी उपस्थित होते.
बैठकीत शिरूर तालुक्यातील ३९ गावातील कोरोना विषयीची माहिती प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली. शिरूर तालुक्यातील ३९ गावात रांजणगाव एमआयडीसी, मलठण व पाबळ येथे कोरोना केअर केंद्र सुरु आहेत. ३९ गावात आतापर्यंत ५ हजार ६४१ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून, ४ हजार ६९९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८४० रुग्ण ऍक्टिव्ह असून १०२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या पाठपुराव्यानुसार मंत्री वळसे पाटील यांच्या माध्यमातून पाबळ येथे सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी असून, आवश्यक स्टाफ व इतर तांत्रिक बाबी पूर्ण करून येथील इमारतीत तातडीने ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात येतील. कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आजपासूनच उपाय योजना आखण्यासाठी प्रशासनाने कामाला लागावे अशी सूचना मंत्री वळसे पाटील यांनी केली असल्याची माहिती श्री पाचुंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. "शासनाने सुरु केलेल्या कोविड सेंटर मधील रुग्णांची सेवा करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुढे यावे, तशी सक्ती शासनाने खासगी डॉक्टरांना करावी अशी मागणी मानसिंग पाचुंदकर यांनी यावेळी केली. नागरिकांनी कोविडची लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा व गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन पाचुंदकर यांनी नागरिकांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.