Pune : धरणावर कपडे धुण्यासाठी गर्दी; दसरा दिवाळी पूर्वीची घरातील स्वच्छता मोहिम सुरु

घटस्थापना गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी होत आहे. नवरात्रापूर्वी आज शेवटचा रविवार असल्याने खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती. दरम्यान आज धरणातून पाणी सोडल्याने पात्रालगत कपडे धुतले जात होती.
Rush to wash clothes khadakwasla dam household cleanliness before Dussehra Diwali festival
Rush to wash clothes khadakwasla dam household cleanliness before Dussehra Diwali festivalsakal
Updated on

खडकवासला : घटस्थापना गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी होत आहे. नवरात्रापूर्वी आज शेवटचा रविवार असल्याने खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती. दरम्यान आज धरणातून पाणी सोडल्याने पात्रालगत कपडे धुतले जात होती.

पितृ पंधरवड्यानंतर देवीची स्थापना होते. म्हणून घर स्वच्छ केले जाते. त्यातील एक भाग म्हणून घरातील अंथरूण पांघरूण अशी सर्व कपडे धूतली जातात. खडकवासला धरणालगत नदीच्या पात्रात खडकाचा परिसर मोठा आहे. गोधड्या आपटून स्वच्छ करण्यासाठी खडक आहे. त्या वाळत टाकण्यासाठी खडकावर जागा देखील मुबलक आहे. अनेकांच्या घरातील गोधड्या विविध रंगाच्या असतात. त्यामुळे विविध रंग येथे दिसतात.

यंदा मात्र धरणातून सुमारे चार हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे, पात्रालगत अर्धा किलोमीटर कपडे धुतले जात होते. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत गर्दी होती. दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत खडकवासला एनडीए रस्ता वहातुक कोंडी झाली होती.

घरातील लहान मोठ्या वाहनाने नागरिक कपडे घेऊन येथे आले होते. या काहीजण कपडे धुतल्यानंतर येथे जेवणाचे डब्बे आणले होते

दरवर्षी हीच वेळ का?

खडकवासला धरण परिसर कार्यात मावळात पावसाचे प्रमाण जास्त असते. जून पासून पाऊस वाढत जातो. घरातील अंथरूण- पांघरूण धुण्यास त्यावेळी संधी नसते. गणपतीनंतर पाऊस कमी होऊन ऊन पडते.

पितृ पंधरवड्याच्या दरम्यान नवरात्र पूर्वी घरातील अंथरूण- पांघरूण धुतली जातात. नवरात्र निमित्ताने घरी देव येतात. नवरात्र सुरू होतो. आठ नऊ दिवसांनी दसरा असतो. त्या पुढे १५ दिवसांनी दिवाळी असते. त्यापूर्वी घराची स्वच्छता करण्याची पद्धत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.