पोलिसामधील 'या' माणसाला नक्कीच सलाम करायला हवा !

police
policesakal media
Updated on

पुणे : सचिन खवले (महाराष्ट्र पोलीस), कॉलेज मधील जवळच्या मित्रांपैकी एक.. ज्याने कधीच आम्हाला घरी नाही बोलवलं ... सुरुवातीचे बरेच दिवस असेच गेले हा आपला गप्प असायचा फार कमी बोलायचा.. मग मी अन विश्वास आम्ही स्वतःहून जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला... मैत्री वाढत गेली... नोव्हेंबर नंतर हिवाळा सुरू झाला ….. भावाचा हात जरा वेगळाच वाटायचा...अगदी जसं काही जळवात पायाला नव्हे तर हातालाच झालाय की काय अगदी असा, यावरून हे तर नक्की ठाऊक झालं की हा खरच खूप कठीण काम करत असावा व आम्हाला कळू नये म्हणून आमच्या पासून दूर पळत असावा...मग आम्हीच शक्कल लावली अन एकदा नकळत याला न सांगता घरी पोहोचलो असाच तपास लावीत... जुन्नर मधील खालची आळी जवळील वीटभट्टी वर , पाहतो तर काय उघड्या रचलेल्या विटांची भिंत, त्यावर लोखंडी टीन..

घराची हाईट पण 4 फूट.. अन हा पठया जवळपास 6 फूट... उन्हयाळात गर्मी, अन हिवाळ्यात थंडी व पावसाळ्यात पाणी या तीनही ऋतुसाठी ते घर कुठल्याही प्रकारे योग्य नाही... वीट भट्ट्याच्या मालकाने त्यांच्यासाठी बांधलेली ती तात्पुरती चाळ... की जी वेळेबरोबर चलायमान होती... तो ज्या ठिकाणी राहायचा त्या ठिकाणची मुले शिकत असतील असा विचार ही कुणाच्या मनात येणार नाही... पण नंतर कळलं की हा बहादूर रोज सकाळी 2 वाजता उठून आपल्या हिश्याचा गार बनवून एक हजार वीटा थापून सकाळी 8 वाजता कॉलेजच्या पहिल्या तासाला हजर होतो... त्याला पाहिल्यावर आयुष्यात पहिल्यांदा जाणीव झाली की आपण स्वतःला उगाचच खूप गरीब लेखायचो आणि कष्टाने शिक्षण घेतोय असं उगाच मिरवायचो... जीवनाशी खरा संघर्ष तर हा करतोय... नंतर आम्ही खुलत गेलो... भाऊ गाणं पण खूप छान म्हणायचं पण सुरुवातीला आत्मविश्वास नसल्याने अन लाजाळू स्वभावामुळे कधी स्टेज वर नाही जायचा.. नंतर कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे भाग बनलो , हळू हळू सचिनमधील लाजाळू पणा कमी होत गेला अन थर्ड इअर ला भावाने कॉलेजच्या स्नेह संमेलन मधे 'सोचेंगे तुम्हे प्यार करे की नहीं' हे गाणं गाऊन सगळ्यांचे मनं पण जिंकली अन पारितोषिक ही मिळवलं..

आता पुढे काय करायचं हा प्रश्न... सचिन नेहमी एकच विचार करायचा की मला काही तरी करायचंय अन घरची परिस्थिती बदलायची... एकदा मी त्याला सहज बोललो हाईट छान, वक्तिमत्व छान, पोलीस का नाही होत... भाऊ म्हटला बाकी काही झालो तरी चालेल पण पोलीस नाही होयचं... खूप चीड पोलीस शब्दाची... मग कसं तरी त्याला समजून सांगितलं की मित्रा पोलीस भ्रष्टाचार करत असतील कदाचित पण भ्रष्टाचार न करता म्हणजेच पैसे न भरता मिळणारी एकमेव नोकरी पण पोलीसाचीच आहे बाकी सगळीकडे पैसे भरावे लागतात.. अन आपलं मुख्य टार्गेट परिस्थिती बदलणे आहे नाकी काय चांगलं अन काय वाईट हे ठरवणं... भाऊने फॉर्म भरला... SRPF ग्रुप पुणे या ठिकाणी पण सोबत गेलो म्हटलं आपला भाऊ मूडी आहे परत यायचा... सकाळी लवकर भरती प्रक्रिया सुरू होणार म्हणून रात्रीचा मुक्काम गेट च्या बाहेरच केला.. उघड्या आकाशाखाली.... आमच्या सारखे बरेच होते तिथे सोबतीला....सकाळ झाली, भरती प्रक्रिया सुरू झाली भावाने सगळी व्यवस्थित पूर्ण केली... काही दिवसांनी निकाल आला... भावाचं नाव फलकावर होतं... भाऊ पोलीस झाला होता... घरी आई अन अण्णांना पण कळवलं.. एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती होती ती... क्षणार्धात भावाच्या नशिबाने पलटी मारली होती पण या सगळ्यांमागे कुठेतरी त्याची मेहनत होती अन शिकण्याची जिद्द होती... आपल्या सहपाठी मुलांद्वारे फेकून दिलेल्या पेन मध्ये रिफिल भरून तो पेन वापरणारा सचिन आज एक चांगला पोलीसच नाहीतर एक चांगला व्यक्ती म्हणून उदयास येत आहे... मागील एक महिन्यापासून या महामारीच्या दौऱ्यात पुण्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रोज न चुकता 100 ते 150 गरजवंतांना एक वेळचं जेवण पुरवण्याचा मोठं काम करतोय... ज्याने दुःख आणि कष्ट स्वतः जवळून पाहिलंय तोच व्यक्ती असं करू शकतो... मित्रा सलाम तुझ्या कार्याला... खरंच सार्थ अभिमान वाटतो तुझा... तू त्यादिवशी ही आमची मनं जिंकला होतास अन तू आजही जिंकलास...

शब्दांकन -पंकज चौधरी (उप निरीक्षक , केंद्रीय रिजर्व पोलीस बल)

police
पुणे रिंगरोडची बांधणी ‘एनएचआय’कडे; तर भूसंपादन ‘पीएमआरडीए’कडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.