पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देणारे नातेवाईक आपण पाहिले असतील, पण पुण्यातील एक महिला माणुसकीचा धर्म म्हणून कोरोना रुग्णांना मूठमाती देत आहे. परिस्थिती बघता कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर धार्मिक विधीप्रमाणे अंत्यसंस्कार होत नाहीत; परंतु ही महिला ख्रिश्चन धर्मातील कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यासाठी कबर खोदण्यापासून ते शेवटची मूठमाती टाकेपर्यंत सर्व विधी धार्मिक पद्धतीने पूर्ण करते.
कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या ख्रिश्चन महिलेचे नाव आहे सगई राजेश नायर. गेले चार महिने त्या स्वतः रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन ख्रिश्चन धर्मानुसार त्यावर विधीवत अंत्यसंस्कार करत आहेत. सॅलिसबरी पार्क मिशनरी कब्रस्तानमध्ये त्यांचा आणि सहकाऱ्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. आलेल्या नातेवाइकांना कसल्या प्रकारची कमी त्या पडू देत नाहीत, पुणे हे सावित्रीबाईचं आहे. प्लेग काळात सावित्रीबाई फुले यांनी अंत्यसंस्कार केले होते, मात्र आता कोणी महिला पुढे येताना दिसत नाहीत. सगई नायर यांना आधुनिक 'सावित्री' म्हटलं, तर काही हरकत नाही.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या पीपीई जाळून टाकतात. सर्व मदत करणाऱ्यांना सॅनिटाइझ करतात. अशा आपत्तीच्या स्थितीत महिलांनी पुढे यावे, असं नायर सांगतात. त्यांना मदत करण्यासाठी मुस्लीम मूल निवासी मंच सहकार्य करत असतो. सगइ नायर दुसऱ्या सामजातील अंत्यविधीसुद्धा करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.