पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल

सहकारनगर नागरिक मंचाने मनपा प्रशासन व नगरसेवक यांच्या कामाचा आढावा घेत अनके प्रश्नाचा तक्रारीचा भडिमार केला
पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल
पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवालsakal
Updated on

सहकारनगर : शहरातील विकास हा नागरिकांच्या करातून केला जातो मात्र हा विकास नागरिकांच्या हितासाठी खर्च केला जातो का? किंवा योग्य केला जातो का? यासाठी पुण्यात प्रथमच स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकारनगर नागरिक मंचाची स्थापना केली. या मंचाची वतीने सहकारनगर सातव हॉल येथे वार्ड सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशासन व नगरसेवक यांच्या कामाचा आढावा घेत नगरसेवक, प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांनी प्रश्नाचा भडीमार करून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

यामध्ये वाढती अतिक्रमणे, रस्ते, खेळाची मैदाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, भटकी कुत्री, अनाधिकृत प्लेक्सचे जाळे, कचरा, नावांच्या पाट्या, मोहल्ला कमिटी इ.अनेक विविध मुद्द्यावरून प्रभाग 35 मधील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांना धारेवर धरत अनेक प्रश्न मांडले. यामध्ये पदपथावरील अतिक्रमणे, महापालिकेकडून केले जाणारे अतिक्रम, अनधिकृत जागावर उभी असलेल्या बहुतांश पोलिस स्टेशन, आरोग्य कोटी, फेरीवाला राष्ट्रीय हॉकर्स पॉलिसीची अंमलबजावणी इ. नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून सध्या सहकारनगरमध्ये मोठ्या प्रमाणात खोदाई करून रस्ते खराब केल्याने गॅस पाईपलाईन, समान पाणीपुरवठा योजनासाठी केलेली खोदाई व पुन्हा रस्ते केले जात नाहीत, अशी तक्रार करीत त्यासाठीचा खर्च कोण करते? तसेच कामाचे ऑडिट केले जाते का? सोसायटी व रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाट्या कोणाच्या खर्चातून करता? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल
"राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद"

तसेच पावसाळ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी येते चेंबर  तुंबतात, नाले सफाई व पावसाळ्या पूर्वीची पूर्ण कामे झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक महेश वाबळे, आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप, परिमंडळ उपायुक्त जयंत भोसेकर, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार इ. उपस्थित होते. या उपक्रमात आयोजन सहकारनगर नागरिक मंच यांनी केले. यावेळी इंद्रनील सदगरे, इंद्रजित चिखलीकर, अमित अभ्यंकर, प्रसन्नजीत फडवणीस, नितीन करंदीकर यांनी वार्ड सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी उत्तर देताना म्हणाले, नालेसफाईचे काम वर्षभर सुरू असते आणि वर्ष भर केलेल्या कामाचे ऑडिट केले जाते, असे सांगितले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ बस सेवा सुरळीत सुरू करून सहकारनगर ते स्वारगेट या मार्गावर सोमवार पासून पाच रुपयात अटल बससेवा सुरू केली जाईल, अतिक्रमण संदर्भात येत्या आठवड्यात सहकार नगर मध्येच बैठक घेतली जाईल. मोहल्ला कमिटीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातील असे सांगत नागरिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संवादाच्या दृष्टीने सहकार नागरिक मंचाने राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक सुभाष जगताप, आबा बागुल, अश्विनी कदम, महेश वाबळे यांनी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आपली मनोगते व्यक्त केली.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या :

  • सहकारनगर मधील वाढती अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा.

  • पुरेशी बससेवा उपलब्ध करावीत.

  • सहकारनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी दूर हरवलेले क्षेत्रीय कार्यालय जवळ आणावे

  • भटक्या कुत्र्यांच्याकडे गांभीर्याने पाहावे

  • पूरग्रस्तांचे भूखंड त्वरित नांवावर करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • खोदाई केलेले रस्ते पूर्ववत करावेत

पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल
पुणे : पालघन, कोयता हातात घेऊन व्हिडीओ करणे पडले महागात

सहकारनगर नागरिक मंचतर्फे आयोजित या वार्ड सभेत वस्त्यांमधील नागरिकांना स्थान दिले गेले नसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आणि सभेत गोंधळ घालत सहकारनगर मधीलच नागरिकांचे प्रश्न आहेत का?झोपडपट्टी मधील नागरिकांच्यासमस्याकडे लक्ष द्यावे असे म्हणत नगसेवक व प्रशासनाचे लक्ष वेधले. शेवटी त्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली.

पुणे तिथे काय उणे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं पुणेरी पाट्याची मिश्किल यांचं महत्त्व आहे त्याच प्रमाणे सहकारनगर नागरिक मंचाने सातव हॉल येथे प्रभाग 35 मधील कामाचा लेखाजोखा स्क्रीनवरती दाखवला. न केलेले कामाचा आढावा घेत उद्यानात  ब्लॉक बसवून जॉगिंग ट्रॅक केला असे स्क्रीनवरती दाखवले हा पाहिला का ? असे नगरसेवक ,प्रशासन व नागरिकांना दाखवला पण  प्रत्येक्षात मात्र जॉगिंग ट्रकचे कामच केले नसल्याने निदर्शनास आणून दिले. असे विविध प्रश्नाचा व तक्रारीचा पाढा मांडत मनपा प्रशासन व नगसेवक यांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत  निशाणा साधला.

प्रथमच सहकारनगर नागरीक मंचाने प्रभाग 35 मधील नागरिकांच्या प्रश्नासाठी वार्ड सभेचे आयोजन केले. या सभेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी गर्दी करत अनेक समस्या व प्रश्न उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.