98th Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जाहीर,राज ठाकरेंकडून निवड; शिवरायांच्या राजमुद्रेचा समावेश

दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गुरुवारी बोधचिन्ह जाहीर करण्यात आले.
98th Marathi Sahitya Sammelan
98th Marathi Sahitya Sammelan sakal
Updated on

पुणे : दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गुरुवारी बोधचिन्ह जाहीर करण्यात आले. त्यासाठी घेतलेल्या स्पर्धेतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेल्या बोधचिन्हाची संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे आयोजक असलेल्या ‘सरहद, पुणे’ या संस्थेतर्फे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. यात १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातून अंतिम बोधचिन्हाची निवड करण्याची जबाबदारी मनसे पक्षाचे अध्यक्ष व व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी लोणी काळभोर येथील ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी सादर केलेल्या बोधचिन्हाची अंतिम निवड केली.

‘‘महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपारिक लेखणी बोधचिन्हात स्पष्ट दिसत आहे. हे बोधचिन्ह सरळ आणि साध्या पद्धतीचे असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे,’’ असे ठाकरे यांनी सांगितले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच निवड झालेले बोधचिन्ह तयार करणाऱ्या प्रसाद गवळी यांचा दिल्लीमधील साहित्य संमेलनात विशेष सन्मान केला जाईल, अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.