Sakal Auto Expo 2024 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ला उस्फूर्त प्रतिसाद

हजारो ग्राहकांची एक्स्पोला भेट; अनेकांनी केले वाहनांचे बुकिंग
Sakal Auto Expo 2024
Sakal Auto Expo 2024Sakal
Updated on

Pune News : कोणाला महाविद्यालयात जायचंय..तर कोणाला कार्यालयात जायचंय..तर काहींना आपल्या कुटुंबीयांसमवेत दूरच्या गावी जायचंय..यासाठी स्वतःचे वाहन असावे, हे स्वप्न केवळ स्वप्न न राहता सत्यात उतरले. निमित्त होते ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे.

दोन दिवस चाललेल्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चा रविवारी समारोप झाला. हजारो ग्राहकांनी एक्स्पोला भेट दिली, तर अनेकांनी वाहने बुक केली.नागरिकांना वाहनांची खरेदी अधिक सोपी व्हावी, तसेच त्यांना वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दोन दिवसीय ‘ऑटो एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले होते.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) पार पडलेला हा एक्स्पो अविस्मरणीय ठरला. पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक मोटारी आणि दुचाकींचे अनेक पर्याय नागरिकांना या एक्स्पोमध्ये पाहायला मिळाले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकाच बजेटमधील अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायची, याचा निर्णय घेणे सोपे झाले. कमी वेळात विविध वाहनांची माहिती मिळाली.

इलेक्ट्रिक गाड्यांविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहेत. ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ प्रदर्शनामुळे एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायची, याचा निर्णय घेणे सोपे होते. तसेच, ग्राहकांना कंपनीकडून काय अपेक्षा आहेत. हे समजण्यास मदत होते, असे तुनवाल इ मोटर्सचे व्यवस्थापक तेजस्वी म्हणाले.

ऑटो एक्स्पोला नेहमीच राहणाऱ्या प्रतिसादामुळे आम्ही केव्हाच सहभाग घेणे चुकवत नाही. प्रत्येक एक्स्पोमध्ये आमचे चांगले बुकिंग्स होतात आणि किया सारख्या ब्रॅंडला लोक पसंती देतात.

— सौरभ धांदरफळे, मार्केटिंग मॅनेजर, क्रिस्टल किया, टिळक रस्ता

‘सकाळ’च्या ‘ऑटो एक्स्पो' प्रदर्शनामुळे नागरिकांना गाड्यांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे गाड्यांची तुलना करून गाडी विकत घेण्याचा निर्णय सोयीचा होतो. वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि बजेटमधील कार उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी सोय होते. त्यामुळे हे ऑटो एक्स्पो महत्त्वपूर्ण ठरले.

—अनिल चौगुले, डेक्कन होंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.