Sakal Chitrakala Spardha 2023 : ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ आज रंगणार

विद्यार्थ्यांसह पालक व आजी-आजोबांच्या सहभागाची उत्सुकता
Sakal Chitrakala Spardha 2023 today by sakal show your skill pune
Sakal Chitrakala Spardha 2023 today by sakal show your skill punesakal
Updated on

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित करण्यात येणारी भव्य व विश्वविक्रमी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२३’ आज महाराष्ट्रात व गोव्यात रंगणार आहे. स्पर्धेची सर्व दोन हजार केंद्रे यासाठी सज्ज झाली असून विद्यार्थ्यांसह प्रथमच पालकांचा आणि आजी-आजोबांचाही सहभाग, हे यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे.

Sakal Chitrakala Spardha 2023 today by sakal show your skill pune
Sakal Chitrakala Spardha 2023: चित्रकलेतील महत्वाचे नियम तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या...

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्पर्धा केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा देता येईल. त्यासाठी चित्रकलेचा कागद ‘सकाळ’तर्फे पुरविला जाईल. रंग साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. शाळांशी संलग्न असलेल्या निवडक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्पर्धा ऑफलाइन असेल. तर, इतर सर्व विद्या शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा ऑनलाइन असेल.

Sakal Chitrakala Spardha 2023 today by sakal show your skill pune
Sakal Chitrakala Spardha 2023: सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी!

या उपक्रमाचे हे ३८ वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. यंदाची स्पर्धा पालक व आजी-आजोबांसाठीसुद्धा आयोजित करण्यात येत असून, त्यांच्यासाठी ती ऑनलाइन स्वरूपात असेल. ‘सकाळ मराठी डिजि माध्यम’ हे या स्पर्धेचे शैक्षणिक पार्टनर, तर कोलगेट आणि रिलायन्स स्मार्ट बझार हे सहप्रायोजक आहेत.

Sakal Chitrakala Spardha 2023 today by sakal show your skill pune
Sakal Chitrakala Spardha 2023: तुम्हीही शिका चित्रकला सोप्या पद्धतीने...

ही स्पर्धा विनामूल्य असून सहभागासाठी वयाचे बंधन नाही. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्पर्धा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात असेल. तसेच, पालक आणि आजी-आजोबांसाठी ही स्पर्धा फक्त ऑनलाइन असेल. विजेत्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली.

एकाच दिवशी, एकाच वेळी आयोजित केली जाणारी स्पर्धा याची सर्वत्र ख्याती आहे. कोरोनाकाळातदेखील स्पर्धा ऑनलाइन झाली होती. आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून तिची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे.

ऑनलाइन सहभागासाठी...

ऑनलाइन स्पर्धेची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात अशी असेल. या कालावधीत स्पर्धकांना www.chitrakala.esakal.com या संकेतस्थळावर नोंदणी करून, आपले चित्र अपलोड करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.