पुणे - दहावी, (SSC) बारावीनंतर (HSC) वाणिज्य, व्यवस्थापन, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील संधी जाणून घेत करिअरची (Career) दिशा ठरविताना योग्य मार्गदर्शन मिळाल्याचा आनंद तीन दिवसीय ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२१’ (Sakal Edu Expo 2021) या शैक्षणिक प्रदर्शनात सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थी-पालकांनी (Students and Parents) व्यक्त केला. विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी, शैक्षणिक संस्था आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती, ऑनलाइन व्याख्याने यांचा समावेश असणाऱ्या या प्रदर्शनाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत जवळपास ८५ हजारांहुन अधिक विद्यार्थी-पालकांनी भेट दिली.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२१’ हे शैक्षणिक प्रदर्शन १० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजित केले होते. ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी’ हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होते. प्रदर्शनात देशातील २५ नामांकित विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शनासाठी भरविलेल्या ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२१’ या प्रदर्शनाची सांगता नुकतीच झाली. पहिल्या दिवसांपासूनच प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनासाठी १५ हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर आठवड्याभरात प्रदर्शनाच्या ‘www.sakalexpo.com’ या संकेतस्थळावर ८५ हजारांहुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली.
प्रदर्शनादरम्यान प्रत्येक दिवशी जवळपास पाच हजारांहुन अधिक विद्यार्थी-पालक प्रदर्शनात नव्याने सहभागी होत होते. कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपारिक शाखांबरोबरच अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, स्पर्धा परीक्षा, पॅरामेडिकल, माहिती तंत्रज्ञान, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रातील संधीची माहिती देणाऱ्या ऑनलाइन वेबिनारला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रम, त्याचे वेगळेपण याबाबत प्रदर्शनातील स्टॉल्स्मध्ये माहिती देण्यात आली. तसेच करिअरविषयक मार्गदर्शनासाठी असणाऱ्या ऑनलाइन व्याख्यानातही अनेकांनी उपस्थिती लावली. लाइव्ह चॅटद्वारे विद्यार्थी-पालकांनी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ, समुपदेशक, अभ्यासक यांच्याकडून जाणून घेतली. ऑनलाइन प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, वेबिनार, हेल्प डेस्क येथे भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.