Sakal Education 2023 : फिनलंडमध्ये होणार ‘सकाळ एज्युकॉन २०२३’

भारतीय आणि जागतिक शिक्षण व्यवस्थेत असणारी दरी दूर करण्याचा दुवा...शिक्षणातील नवे बदल स्वीकारून आदर्श निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्था...
Sakal Educon 2023
Sakal Educon 2023sakal
Updated on
Summary

भारतीय आणि जागतिक शिक्षण व्यवस्थेत असणारी दरी दूर करण्याचा दुवा...शिक्षणातील नवे बदल स्वीकारून आदर्श निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्था...

पुणे - भारतीय आणि जागतिक शिक्षण व्यवस्थेत असणारी दरी दूर करण्याचा दुवा...शिक्षणातील नवे बदल स्वीकारून आदर्श निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्था... प्राध्यापक, संशोधक यांच्याशी साधलेला संवाद अन्‌ त्यातून स्थानिक शिक्षण संस्थांसाठी खुली होणारी जागतिक पातळीवरील अमर्याद दालने हेच ‘सकाळ’च्या वतीने आयोजित ‘एज्युकॉन २०२३’ या शैक्षणिक परिषदेचे गमक. यंदा ही परिषद जगातील सर्वांत आनंदी देश अशी ओळख असणाऱ्या फिनलंडमध्ये ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

या शैक्षणिक परिषदेनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी या वेळी मार्गदर्शन केले. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस यांनी फिनलंडमधील शिक्षण व्यवस्था, ‘एज्युकॉन’च्या निमित्ताने उपलब्ध होणाऱ्या संधी आणि वैशिष्ट्यांबाबत सादरीकरण केले. ते म्हणाले, ‘‘गेल्या २०-३० वर्षांपासून फिनलंड हा जगात शिक्षणासाठी ‘टॉप’ असणाऱ्या देशांपैकी एक आहे. या देशात सर्वांना पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत दिले जाते. स्पर्धेपेक्षा सहकार्यातून पुढे जाण्याला आणि मूलभूत शिक्षणाला प्राधान्य देणारी येथील शिक्षण व्यवस्था आहे.’’

‘एज्युकॉन’ परिषद भरविण्यामागील उद्देश सांगताना पवार म्हणाले, ‘‘एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू हा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांना नवा दृष्टिकोन देऊ शकतो. त्यामुळे देशातील विद्यापीठांनी, शिक्षण संस्थांनी जागतिक पातळीवर शिक्षणात होणारे नवे बदल जाणून घेणे, त्या दृष्टीने विचार करणे आणि ते आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून ही परिषद भरविण्यात येते.’’ या वेळी ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ‘सकाळ’चे मुख्य विपणन अधिकारी नवल तोष्णीवाल यांनी प्रास्ताविक केले, तर ‘सकाळ’च्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे व्यवस्थापक राहुल जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

गेल्या वर्षी ‘सकाळ’च्या वतीने सिडनी येथे झालेल्या ‘एज्युकॉन’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठे, नामांकित प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी साधलेल्या संवादातून जागतिक स्तरावरील शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला. ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्राला पूरक असे कौशल्यावर आधारित शिक्षण, नॅनो टेक्नॉलॉजी, सिटी इनोव्हेशन लॅब हे पाहता आले.

- विक्रम सराफ, संस्थापक, क्लिनटेक एक्स्चेंज

जगात शिक्षण व्यवस्थेत होणारे नवे बदल, त्यातील संधी जाणून घेण्यासाठी ही परिषद म्हणजे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. आपली संस्था आंतरराष्ट्रीय सहयोगातून अधिकाधिक वृद्धिंगत होण्याचे पर्याय यानिमित्ताने खुले होतात. देशातील शिक्षण संस्थांचे विदेशातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांशी सामंजस्य करार याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कॅम्पस सुरू करण्याचा माध्यम म्हणून ‘एज्युकॉन’ महत्त्वपूर्ण ठरत आहे.

- तुषार देवरस, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ॲस्ट्युट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमी

बहुआयामी आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि त्यातील संधी जाणून घेण्याचे व्यासपीठ म्हणजे ‘एज्युकॉन’ परिषद. देश-विदेशातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांसमवेत विद्यार्थी-प्राध्यापक एक्स्चेंज प्रोग्रॅम, सामंजस्य करार, संशोधन प्रकल्प राबविण्याची संधी मिळते. ‘शिक्षण संस्था किंवा प्राध्यापक म्हणून आपण कोठे आहोत आणि कोठे जाऊ शकतो, याचा अंदाज परिषदेच्या निमित्ताने येतो.

- अमित कोल्हे, व्यवस्थापकीय विश्वस्त, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट , कोपरगाव

जागतिक शिक्षण व्यवस्थेतील नवे बदल आत्मसात करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ते साध्य करण्यासाठी ‘सकाळ’ आयोजित ‘एज्युकॉन’ परिषद उपयुक्त आहे. आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांनाही जगभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांसमवेत करार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या दिशेने पाऊल टाकण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे.

- अपूर्व हिरे, व्यवस्थापकीय संचालक, कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.