Sakal Excellence Awards
Sakal Excellence AwardsSakal

सकाळ एक्सलेन्स अँवार्डचे पुण्यात वितरण

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या 35 मान्यवरांना अँड. उज्वल निकम यांच्या हस्ते सकाळ एक्सलेन्स अँवार्ड देऊन गौरविण्यात आले.
Published on
Summary

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या 35 मान्यवरांना अँड. उज्वल निकम यांच्या हस्ते सकाळ एक्सलेन्स अँवार्ड देऊन गौरविण्यात आले.

बारामती - स्वःताचा विकास साध्य करण्यासोबतच इतरांनाही सोबत घेऊन जाण्याचे काम करणा-या तसेच शून्यातून विश्व निर्माण करुन सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणा-या मान्यवरांना गौरविण्याचा सकाळ माध्यम समूहाचा (Sakal Media Group) उपक्रम प्रशंसनीय आहे, असे गौरवदगार ज्येष्ठ विधीज्ञ व विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम (Ad. Ujjwal Nikam) यांनी काढले.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या 35 मान्यवरांना मंगळवारी (ता. 1) पुण्यात झालेल्या कार्यक्रमात अँड. उज्वल निकम यांच्या हस्ते सकाळ एक्सलेन्स अँवार्ड देऊन गौरविण्यात आले. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, समूह संपादक संचालक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, निवासी संपादक रमेश डोईफोडे, वरीष्ठ उपसंपादक नीलेश शेंडे या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी उज्वल निकम म्हणाले, समाजामध्ये काहीतरी चांगल घडत त्याच प्रतिबिंब सकाळमध्ये उमटते, समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याचे काम सातत्याने सकाळने केले, त्याच उद्देशाने समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना गौरविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. केवळ स्वःताची प्रगती साध्य करुन नाही तर इतरांनाही आपल्या सोबत घेऊन जाण्याचे काम अनेक लोक करतात. अशा लोकांना शोधून त्यांना सन्मानित करण्याचे काम या उपक्रमाद्वारे झाले आहे.

Sakal Excellence Awards
विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं कारण नाही - शरद पवार

आपण ज्या पध्दतीने सामान्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने लढतो त्याचप्रमाणे सकाळच्या माध्यमातूनही नेहमी विधायक उपक्रमांना प्रसिध्दी देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले जाते. अशा सत्कारामुळे चांगले काम करणा-यांना प्रोत्साहन मिळते व ते अधिक जोमाने कामाला लागतात.

या प्रसंगी स्वागत करताना प्रतापराव पवार म्हणाले, समाजात वेगळे काहीतरी करु पाहणा-यांना समाजासमोर आणून त्यांचाही आदर्श इतरांनी घ्यावा असा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो. सकाळ किंवा अँग्रोवनमधून नेहमी पॉझिटीव्ह बातम्या करा असा आमचा आग्रह असतो, अँग्रोवनमध्ये दररोज दोन यशोगाथा प्रसिध्द केल्या जातात, त्याचा फायदा संबंधितांना होतो.

या प्रसंगी सकाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, चीफ मार्केटींग ऑफिसर नवल तोष्णीवाल, जाहिरात सरव्यवस्थापक (रेस्ट ऑफ महाराष्ट्र) उमेश पिंगळे, उपसरव्यवस्थापक रुपेश मुतालिक, मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, इव्हेंट मॅनेजर विनायक बावडेकर, व्यवस्थापक संतोष पोटे व संजय घोरपडे आदी उपस्थित होते. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Sakal Excellence Awards
अर्थसंकल्पाने सामान्य माणसाच्या पदरी निराशाच - शरद पवार

या मान्यवरांचा झाला गौरव...

बारामती विभाग -

• विणाताई हेमंत सोनवणे

• अंकिता मुकुंद शहा

• महेश रविंद्र कामथे

• स्वप्निल पोपटलाल शहा

• मिलिंद मोहिते

• विक्रांत तांबे

• रणजित तावरे

• सचिन कुलकर्णी

• जितेंद्र जाधव

• निशिकांत भालेराव

• सतीश राऊत

• किशोर भापकर

• उध्दव गावडे

• भगवान चौधर

• निर्मला रमेश भोईटे

• विनोद धनपाल गांधी

• सुभाष पांडुरंग क्षीरसागर

• कल्याण तावरे

खेड विभाग -

• डॉ. विनायक खेडकर

• विनय दत्तात्रेय गायकवाड

• संदीप रामदास लवांडे

• संदीप एकनाथ ढमढेरे

• सागर पाटोळे

• देवेंद्र धरमचंद फुलफगर

• कृष्णा घावटे पाटील

• किरण पठारे पाटील

• कविता अजित गायकवाड

• अरविंद सुदाम पवार

• बाबाजी काळे

• दिनेश छगनलाल

• शिवराय फुड मॉल

• रुणाल पवार

• वैभव विलासराव तांबे

• यशवंत डाळ

• डॉ.नम्रता सचिन निकम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()