पुणे - शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. वणवण करूनही ते मिळत नाही. त्याचा काळाबाजार सुरू आहे. अशी वस्तुस्थिती असताना मात्र, बाजारात या इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याचा अजब दावा मंगळवारी खुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केला आहे.
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टर आता रुग्णाच्या नातेवाइकांना लिहून देत आहेत. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईक अक्षरशः दिवस-रात्र न पाहता धावपळ करत आहेत. त्यानंतरही त्यांना इंजेक्शनची एकही वायल मिळत नाही. काही ठिकाणांहून ती एमआरपीपेक्षा जास्त दराने विकून त्याचा काळाबाजार होत आहे. ही वस्तुस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. इतकेच नव्हे तर या इंजेक्शनच्या बारा वितरकांचे नाव, दूरध्वनी व मोबाईल नंबरसह यादी प्रसिद्ध केली.
यादीची गौडबंगाल काय?
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या वितरकांच्या यादीतील प्रत्येक वितरकाशी "सकाळ'ने प्रत्यक्ष संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळेल का?, याची चौकशी केली. बारापैकी सहा वितरकांनी "इंजेक्शन उपलब्ध नाही', असे स्पष्टपणे सांगितले. "आम्ही हे इंजेक्शन आतापर्यंत कधीच खरेदी केले नाही', अशी माहिती दोन वितरकांनी दिली. तर, उर्वरित चारपैकी तिघांनी फोन उचलला नाही आणि एका वितरकाचा फोन बंद होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी प्रसिद्ध केलेल्या यादीचे गौडबंगाल काय, कोणत्या आधारावर ही यादी प्रसिद्ध केली, असा सवाल या वितरकांनी केला. अन्न व औषध विभागाने एप्रिलमध्ये तयार केलेली ही यादी आहे, ती अद्ययावत न करताच "एफडीए'ने जिल्हा प्रशासनाला दिली असल्याचा दावाही यापैकी काहींनी केला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
""रेमडेसिव्हिरचा सोमवारी आठ हजार वायलचा पुरवठा झाला. मंगळवारी चार हजार 500 आला आहे. हा वितरित केला जातो. त्यामुळे हा साठा रुग्णालयांमध्ये आहे,'' अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी दिली.
येथे संपर्क साधा
या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर द्यावी, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
"सकाळ'ने केली तपासणी
वितरक | मिळालेला प्रतिसाद | नाव | दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक |
कुंदन डिस्ट्रिब्युटर | उपलब्ध नाही | राहुल दर्डा | ... 020-67642525, 9923940000 |
रोहित एंटरप्रायझेस | उपलब्ध नाही | रोहित करपे | 020-24481222, 9822192558 |
पूना हॉस्पिटल मेडिकल स्टोअर | उपलब्ध नाही | रेशन जैन | 020-24338768, 9822061118 |
अरिहंत केमिस्ट फोन | उपलब्ध नाही | राजेश जैन | 020-24454320, 9595440000 |
साईराज डिस्ट्रिब्युटर्स . | उपलब्ध नाही | दीपक कासार | 7709114172, 8208004190 |
जीवन मेडिसेल्स | उपलब्ध नाही | जगदीश मुंदडा | 020-24465561, 020-24491994, 9822036732 |
प्रकाश मेडिकल सेंटर | खरेदीही नाही | गिरीश लुणावत | 020-26122264, 9890680696 |
मॉडर्न डिस्ट्रिब्युटर | खरेदी केली नाही | प्रदीप कावेडिया | 020-24450057, 020-24450539, 9822010035 |
तापडीने डिस्ट्रिब्युटर | फोन बंद | तापडिया | 9822490756 |
श्री फार्मा | फोन लागत नाही | प्रतीक | 9139963601 |
कुंदन एजन्सी, चिंचवड | फोन उचलला नाही | अजय दर्डा | 020-27470078, 9890023634 |
एमएम फार्मा, चिंचवड | फोन लागला नाही | विनय गुप्ता | 020-27473746, 9823116736 |
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.