Sakal Impact : बोपदेव घाट रस्ता झाला चकाचक

प्रशासनाने याची दखल घेत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून रस्त्यांवरील कचरा उचलण्यात आला आहे.
Sakal Impact : बोपदेव घाट रस्ता झाला चकाचक
Updated on

कात्रज : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील बोपदेव घाट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यानंतर 'सकाळ'मधून याबाबत बोपदेव घाटाच्या सौंदर्याला बाधा या मथळ्याखाली वृ्त्त प्रकाशित करण्यात आले होते. बोपदेव घाट मार्ग आता बेजबाबदार नागरिकांमुळे कचराकुंडी बनला होता. बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून रस्त्यांवरील कचरा उचलण्यात आला आहे. (Pune News)

प्रभाग क्रमांक ४१(कोंढवा येवलेवाडी)च्या हद्दीत हा रस्ता येतो. शहरालगतची हॉटेल आणि घरांमधील कचरा, ई-कचरा बांधकामाचा राडारोडा आणि थर्माकॉलसारखा औद्योगिक कचराही मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूला पडल्याचे दिसत होते.

घाटालगतच्या रस्त्यांवर रात्रीच्यावेळी हा कचरा टाकला जातो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग लागले होते. महापालिकेने हद्दीतील सर्व कचरा उचलला आहे.

Sakal Impact : बोपदेव घाट रस्ता झाला चकाचक
काबूल बॉम्बस्फोट: इस्लामिक स्टेट खोरासनमध्ये केरळचे १४ जण

बोपदेव घाट रस्त्यांवरील महापालिकेच्या हद्दीतील सर्व कचरा उचलण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी गस्त घालण्यात येत असून यानंतर रस्त्यावर कचरा होणार नाही. याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून काळजी घेतली जाईल.

- विकास मोरे, आरोग्य निरिक्षक, कोंढवा येवलेवाडी, क्षेत्रिय कार्यालय

मी या रस्त्यांवर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असतो. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. मात्र, आता सकाळच्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने हा कचरा साफ केला असून यापुढेही प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.

- संदीप धांडेकर, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.