Shelar Mala : शेलारमळ्यातील ओढ्यात सांडपाणी मिसळल्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीवर 'सकाळ'च्या वृत्तामुळे प्रशासनाला जाग आली आणि ओढ्याची पूर्ण सफाई करण्यात आली.
कात्रज : शेलारमळा परिसरातील वास्तुश्री सोसायटीजवळ ओढ्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. ड्रेनेजचे चेंबर फुटून पाणी पावसाळी वाहिनीत आणि ओढ्यात मिसळत होते.