Sakal Khau Galli 2024 : ‘सकाळ खाऊगल्ली’चे थाटात उद्‍घाटन

‘सकाळ खाऊगल्ली’ उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
sakal khau galli 2024 inauguration at mahalaxmi lawns actress Spruha Joshi
sakal khau galli 2024 inauguration at mahalaxmi lawns actress Spruha JoshiSakal
Updated on

Sakal Khau Galli 2024 : खाद्यप्रेमी दरवर्षी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, तो म्हणजे, ‘सकाळ माध्यम’ समूहाच्या वतीने आयोजित ‘सकाळ खाऊगल्ली’ खाद्यमहोत्सव. या महोत्सवाचे उद्‍घाटन अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्समध्ये थाटात करण्यात आले.

‘सकाळ खाऊगल्ली’ उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. त्याचे ‘काका हलवाई स्वीट्‌स सेंटर’, ‘बारामती तालुका दूध उत्पादक संघ (नंदन दूध)’ असोसिएट पार्टनर असून, ‘बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ फायनान्स पार्टनर आहेत,

तर ‘आजोळ डे केअर अँड प्री स्कूल’ गेम झोन पार्टनर आहेत. या प्रसंगी ‘काका हलवाई’चे संचालक समीर गाडवे, ‘आजोळ’च्या मोनिका कुलकर्णी, ‘बुलडाणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे तसेच व्यावसायिक उपस्थित होते.

‘सकाळ खाऊगल्ली’च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना व्यवसायाची संधी आणि खवय्यांना विविध भागांतील शाकाहारी, मांसाहारी नवनवीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसमवेत कोल्हापूर, खानदेशी अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यपदार्थांची चव येथे चाखायला मिळत आहे.

‘खाऊगल्ली’चे पुढील दोन दिवस हे खाद्यप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहेत. याशिवाय गेमिंग झोन, लाइव्ह बँड, मॅजिक शो, म्युझिक यांचेही खास आकर्षण असणार आहे. खाऊगल्ली शनिवार (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत खुली असेल. येथे पार्किंगची व्यवस्था आहे. तर प्रवेश फी प्रत्येकी ५० रुपये आहे.

नैसर्गिकरित्या उत्पादनातून तयार केलेले, अस्सल खानदेशी मसाले आम्ही विकतो. जळगाव येथून आम्ही आलो आहोत. उपक्रमात सहभागी होण्याचे आमचे दुसरे वर्ष आहे. लाल तिखट, हळद, धने पावडर, आदी विविध प्रकारचे मसाले आहेत.

- महेंद्र चौधरी, भास्कर मसाले

‘‘मला खाद्यपदार्थ खूप आवडतात. आपल्याकडे असं म्हणतात की, जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो, तर मी खाण्यासाठी जगते! असं म्हणायला हरकत नाही. एकाच छताखाली अनेक व्यावसायिकांना एकत्र करून, पुणेकरांना विविध खाद्यपदार्थ खाण्याची सोय एकाच ठिकाणी करणे हे ‘सकाळ’ माध्यम समूहाशिवाय शक्य नाही.

- स्पृहा जोशी, अभिनेत्री

आमच्याकडे विविध प्रकारचे मासे मिळतात. सुरमई थाळी, फ्राय, पापलेट थाळी, फ्राय, फ्रॉन्स, बिर्याणी असे अनेक स्वादिष्ट पदार्थ पुणेकरांना या ठिकाणी खायला मिळतील. ‘खाऊगल्लीत’ आम्ही अनेक वर्षांपासून सहभागी होत आहोत. ग्राहकांचा येथे कायमच चांगला प्रतिसाद मिळतो.

- कृष्णात पाटील, हॉटेल आमची

असे होणार कार्यक्रम

शनिवार (ता. ६)

  • सायं. ५.३० ते ७.३० - गायक जितेंद्र भुरुक यांचा मेलोडी गाण्यांचा म्युझिक शो

  • सायं. ७.३० ते रात्री ८.३० - जादूगार प्रसाद कुलकर्णी यांचा मॅजिक शो

  • रात्री ८.३० ते १० - सफल बँड

रविवार (ता. ७)

  • सायं. ६.३० ते ७ - मृदुंग डान्स अकॅडमी यांचा फ्लॅश मॉब

  • सायं. ७ ते रात्री ८ - जादूगार प्रसाद कुलकर्णी यांचा मॅजिक शो

  • रात्री ८ ते १० - सफल बँड (मॅशप सॉग्ज)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.