पुणे - वेगवेगळ्या चवीचे लोकप्रिय शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांची लज्जत चाखण्याची संधी नागरिकांना ‘सकाळ खाऊगल्ली’त मिळणार आहे. या खाऊगल्लीचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन वाजता होणार आहे. या प्रसंगी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री स्पृहा जोशी उपस्थित राहणार आहेत. कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्समध्ये खाऊगल्ली रविवारपर्यंत (ता. ७) खुली आहे.
‘सकाळ’ आयोजित खाऊगल्ली उपक्रमाचे यंदाचे सातवे पर्व आहे. ‘सकाळ खाऊगल्ली’चे काका हलवाई स्वीट्स सेंटर, बारामती तालुका दूध उत्पादक संघ (नंदन दूध) असोसिएट पार्टनर असून, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फायनान्स पार्टनर आहेत, तर ‘आजोळ डे केअर ॲण्ड प्री स्कूल’ गेम झोन पार्टनर आहेत. पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसमवेत कोल्हापूर, खानदेशी अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यपदार्थांची चव येथे चाखायला मिळणार आहे.
या उपक्रमानिमित्त नागरिकांना त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद एकाच छताखाली घेता येणार आहे. ‘खाऊगल्ली’चे तीन दिवस हे खाद्यप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय गेमिंग झोन, लाइव्ह बँड यांचेही खास आकर्षण असणार आहे. खाऊगल्ली शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन वाजल्यापासून खुली असेल.
शनिवार (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत खाऊगल्ली खुली असेल. येथे पार्किंगची व्यवस्था आहे, तर प्रवेश फी प्रत्येकी ५० रुपये आहे.
असे होणार कार्यक्रम
शुक्रवार (ता. ५)
सायं. ७ ते ८ : जादूगार प्रसाद कुलकर्णी यांचा मॅजिक शो
रात्री ८ ते ९.३० : सफल बँड (जुन्या आणि नवीन गाण्यांचा संगम)
शनिवार (ता. ६)
सायं. ५.३० ते ७.३० : गायक जितेंद्र भुरुक यांचा मेलडी गाण्यांचा म्युझिक शो
रात्री ८.३० ते १० : सफल बँड
रविवारी (ता. ७)
सायं. ६.३० ते ७ : मृदुंग डान्स ॲकॅडमी यांचा ‘फ्लॅश मॉब’
सायं. ७ ते ८ : जादूगार प्रसाद कुलकर्णी यांचा मॅजिक शो
रात्री ८ ते १० : सफल बँड (मॅशप साँग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.