Sakal Presented Suhana Swasthyam : 'चिंचवडमध्ये आज ‘मोगरा फुलला’ ; प्रा. गणेश शिंदे यांचे निरूपण अन् सन्मिता शिंदे यांचे गायन

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत सकाळ माध्यम समूहातर्फे संत ज्ञानेश्वर माउलींच्या स्वास्थ्यविषयक अभंग व ओव्यांवर आधारित प्रसिद्ध व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार प्रा. गणेश शिंदे यांचे निरूपण आणि गायिका सन्मिता धापटे - शिंदे यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत कार्यक्रम पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
Sakal Presented Suhana Swasthyam
Sakal Presented Suhana Swasthyamsakal
Updated on

पिंपरी : ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत सकाळ माध्यम समूहातर्फे संत ज्ञानेश्वर माउलींच्या स्वास्थ्यविषयक अभंग व ओव्यांवर आधारित प्रसिद्ध व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार प्रा. गणेश शिंदे यांचे निरूपण आणि गायिका सन्मिता धापटे - शिंदे यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत कार्यक्रम पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून, कार्यक्रमासाठी ज्यांनी नोंदणी केली आहे व ज्यांच्याकडे कार्यक्रमाच्या प्रवेशिका आहेत, अशा सहभागींना प्रथम प्राधान्य असेल.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून व्याख्याते प्रा. गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता धापटे - शिंदे आपल्या सुमधूरवाणीतून संत ज्ञानेश्वर माउलींचे चरित्र प्रेक्षकांसमोर मांडून स्वास्थ्य व समाजविषयक प्रबोधन करणार आहेत. उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’ असून, पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’ व सहप्रायोजक विजय सेल्स, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, ‘निरामय वेलनेस सेंटर’, ‘डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी’ हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.