पुणे - महाराष्ट्रासह देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व पुनर्वसन करण्यासाठी १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सामाजिक जाणिवेतून सातत्याने भरीव कार्य करत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत इर्शाळवाडी ग्रामस्थांना मदत व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दानशूरांना मदतीचे आवाहन केले आहे.
‘सकाळ रिलीफ फंडा’चे सामाजिक कार्य..
पानशेत धरण दुर्घटना (१९६१) : एक लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा करून तातडीची मदत म्हणून १० हजार लोकांना कपडे वाटप.
आंध्रप्रदेशातील चक्रीवादळ (१९७७) : तातडीची वैद्यकीय मदत म्हणून दोन लाख रुपये किमतीची ५० हजार लोकांसाठी औषधे.
मराठवाड्यातील भूकंप (१९९३) : सहा हजार लोकांसाठी चार ठिकाणी मोफत जेवणाची सोय. तसेच, त्याभागात पुनर्वसन म्हणून एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी संकलित करून, सात गावांमधील सात शाळांचे नूतनीकरण, इमारत बांधकाम व मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम.
कारगिल युद्ध (१९९९) : युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या पाच हजार भारतीय सैनिकांना एक कोटी १० लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य व उपकरणांचे वाटप. तसेच, सैनिकांच्या मुलींसाठी पुणे, कोल्हापूर, अमरावती व रत्नागिरीत दोन कोटी ६० लाख रुपये खर्च करून वसतिगृहांची उभारणी.
गुजरात भूकंप (२००१) : तातडीची मदत म्हणून १२ लाख रुपयांचा निधी जमा करून रक्त संकलनासाठी रुग्णवाहिका गुजरात राज्यात पाठविली. तसेच, तीन कोटी रुपये संकलित करून ७० शाळांचे नूतनीकरण, बांधकाम व एका वसतिगृहाची उभारणी केली.
कोल्हापूर-सांगली महापूर (२०१९) : एक कोटी १८ लाख ८७ हजार रुपये संकलित करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्य किट, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. तसेच, कोल्हापूर- सांगली भागातील ३९ शाळांना इमारत दुरुस्ती, शैक्षणिक व भौतिक साहित्य खरेदी, वर्गखोल्या बांधकाम व शाळांच्या नूतनीकरणासाठी मदतीच्या सात टप्प्यात दोन कोटी ४२ लाख २६ हजार रुपयांची मदत.
पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव २०१४ मध्ये डोंगरकडा कोसळून गाडले गेले होते. तेथे पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने केलेल्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
माळीणसाठी जमा झालेल्या देणगीतून माळीण व आंबेगाव तालुका परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक कोटी २५ लाख रुपये संकलित करून एका वसतिगृहाची उभारणी केली आहे. आजमितीस माळीण परिसरातील १२५ हून अधिक विद्यार्थी वसतिगृहाचा लाभ घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.