Sakal Shopping Festival 2023 : सणासुदीच्या खरेदीचे महासेलिब्रेशन... सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलमध्येच!

पुढील महिन्यात दिवाळी सुरू होत असून, खरेदीची आत्तापासूनच तयारी
sakal shopping festival 2023 at pandit farms dp road karve nagar diwali shopping pune marathi news
sakal shopping festival 2023 at pandit farms dp road karve nagar diwali shopping pune marathi newsSakal
Updated on

Sakal Shopping Festival : पुढील महिन्यात दिवाळी सुरू होत असून, खरेदीची आत्तापासूनच तयारी करायला हवी. दिवाळीसाठी विविध प्रकारची खरेदी, ही बाजारपेठेतील भर गर्दीत, अनेक दुकाने पालथी घालून करणे हा प्रकार अत्यंत कंटाळवाणा, त्रासाचा व शीण आणणारा ठरतो. ही सर्व खरेदी एकाच ठिकाणी, एकाच छताखाली निवांतपणे करता आली तर किती बरे होईल?

ग्राहकांची व तमाम गृहिणीवर्गाची ही गरज लक्षात घेऊनच "सकाळ”ने महाराष्ट्राचा लाडका खरेदी उत्सव, "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल” चे आयोजन पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे येथे दि. २६ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयोजित केला आहे.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे की, या प्रदर्शनात २५० हून अधिक नामांकित कंपन्यांचे विविध प्रकारचे स्टॉल्स असून यामध्ये फर्निचरपासून फर्निशिंग्जपर्यंत, घरगुती उपकरणांपासून किचन गॅजेट्सर्पंत, गॅस शेगडीपासून चिमनीज्पर्यंत, मसाले, लोणच्यांपसून मिक्सरपर्यंत, फॅशनेबल कपड्यांपासून फॅन्सी फूटवेअर्स व ज्वेलरीपर्यंत अशा अनेक गोष्टींची रेलचेल आहे. इतकेच नाही तर या सर्व गोष्टींवर डिस्काऊंट्स व आकर्षक ऑफर्ससुद्धा उपलब्ध आहेत.

या प्रदर्शनातील अनोख्या ब्रॅण्डेड वस्तू या थेट उत्पादकांकडून त्यांच्या येथील स्टॉल्समध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे, या वस्तू अत्यंत माफक दरात मिळू शकतात. उत्तम, दर्जेदार, ब्रॅण्डेड व लेटेस्ट व्हरायटीजच्या या वस्तूंच्या खरेदीमध्ये ग्राहकांची चार पैशांची बचतही निश्चितपणे होणार आहे यात शंका नाही.

दि. २६ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हे प्रदर्शन चालू राहणार असून, सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत तुमच्या सोयीनुसार लवकरात लवकर या प्रदर्शनास नक्की भेट द्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.