Sakal Vastu Expo 2023 : सकाळ वास्तू एक्स्पो’ उद्यापासून

नागरिकांना घर घेणे सोपे व्हावे म्हणून आयोजित एक्स्पोची सुरवात
Sakal Vastu Expo 2023 To make it easier to buy house Information on construction projects
Sakal Vastu Expo 2023 To make it easier to buy house Information on construction projectssakal
Updated on

पुणे : शहराच्या सर्व भागात असलेल्या विविध प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांची माहिती उद्यापासून नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समुहा’च्या वतीने ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना घर घेणे सोपे व्हावे म्हणून आयोजित एक्स्पोची सुरवात उद्यापासून (ता. २७) होणार आहे.

शनिवार (ता. २७) आणि रविवारी (ता. २८) असा दोन दिवस चालणारा हा एक्स्पो बाणेर रस्त्यावरील माऊली गार्डन, सर्वे. नं. २७४/ २, भारत पेट्रोलियम पंपाजवळ येथे भरविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यातील बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रकल्प सध्या पुण्यात सुरू आहेत. या सर्वांत शहराच्या पश्‍चिम बाजूला अनेकांची पसंती मिळत आहे. त्यानुसार बाणेर भागात तिसऱ्यांदा या एक्स्पोचे आयोजन करण्यात येते आहे.

Sakal Vastu Expo 2023 To make it easier to buy house Information on construction projects
Sakal Vastu Expo 2023 : अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली

मेट्रो आणि रिंगरोडमुळे शहरातील कनेक्टिव्हिटी वाढत आहे. विस्तारत असलेल्या या नागरी सेवांचा फायदा घेता येवू शकतो असे अनेक प्रकल्प या एक्स्पोत असणार आहेत. शहराच्या सर्व भागात सध्या झपाट्याने विकासकामे सुरू आहे. यात पश्‍चिम भाग देखील आघाडीवर आहे. हिंजवडीत असलेले आयटी क्षेत्र व त्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था वाढतच आहे. त्याअनुषंगाने वाढत असलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ घेता येवू शकणारे प्रकल्प याठिकाणी नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.

Sakal Vastu Expo 2023 To make it easier to buy house Information on construction projects
Vastu Tips : सर्व श्रीमंतांच्या घरी हे रोप का दिसतं? जाणून घ्या

२० हून विकसकांचे ५० पेक्षा जास्त प्रकल्प या एक्स्पोत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे घर खरेदीचा निर्णय घेणे सुखकर होर्इल. विशेष म्हणजे एक्स्पो संपूर्ण वातानुकूलित हॉलमध्ये होणार असून त्यात फ्लॅट, बंगलो, रोहाऊस, रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एन.ए. प्लॉटचे विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

‘सकाळ वास्तू एक्स्पो’बाबत :

  • कधी : शनिवार व रविवार (२७ आणि २८ मे)

  • कुठे : माऊली गार्डन, बाणेर रस्ता, सर्वे. नं. २७४/ २, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, बाणेर

  • एक्स्पोची वेळ : सकाळी १० ते रात्री ८.

  • प्रदर्शनात सहभाही विकसक : २० हून अधिक

  • प्रकल्पांची संख्या : ५० हून अधिक

  • पार्किंग : विनामूल्य

  • संपूर्ण वातानुकूलित हॉल

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२९१३२९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.