Sakal Vastu Expo : ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला पुणेकरांनी दिला उदंड प्रतिसाद

घर खरेदीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पुणेकरांनी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला.
Sakal Vastu Expo Opening
Sakal Vastu Expo Openingsakal
Updated on

पुणे - घर खरेदीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पुणेकरांनी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी एक्स्पोचे उद्‍घाटन झाले.

विस्तारणाऱ्या पुणे शहरात घरांची मागणी वाढली आहे. त्यात बांधकाम साहित्याच्या दरातील वाढीमुळे सदनिका, फार्म हाऊस प्लॉट्स आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे घर खरेदी आवाक्याबाहेर जाण्याआधीच आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये नागरिकांना मिळत आहे.

संतोष पाटील म्हणाले, ‘अन्न आणि वस्त्रांबरोबरच घर हे व्यक्तीच्या आयुष्यातील मूलभूत गरज आहे. आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारे घर असावे, असे स्वप्न अनेकांनी उराशी बांधलेले असते. याचीच दखल घेत ‘सकाळ माध्यम समूहा’ने गृहप्रकल्पाचे विकसक आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा एक्स्पो आयोजित केला आहे. हा एक्स्पो कमी वेळात जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देणारा पर्याय आहे.’

पुण्याची वाढ चारही बाजूंनी होत असल्यामुळे रिअल इस्टेट मार्केट हे गेल्या वर्षभरापासून पहिल्या क्रमांकावर आहे. प्लॉट्स, ॲग्रिकल्चरल जागा, बंगलो यांवर लोकांचा भर आहे. सकाळ वास्तूमध्ये मध्यमवर्गीयांनासुद्धा घर खरेदी किंवा प्लॉट्समध्ये गुंतवणूक करता येतील असे प्रोजेक्ट्स उपलब्ध आहेत.

- अतुल जेठमलानी, संचालक, न्यूलिफ लाइफस्पेस

नवनवीन निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन या एक्स्पोत आहे. पुण्यातील संभाव्य ग्राहकांशी जोडण्यासाठी तसेच आमचे नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यासाठी हा एक्स्पो उत्तम पर्याय आहे. आमच्या प्रत्येक प्रकल्पाद्वारे ग्राहकांना आनंद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

- नचिकेत येवले, संचालक, पार्थ ग्रुप

खुला प्लॉट घेताना नागरिकांना खात्रीशीर पर्याय हवा होता. या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या माध्यमातून विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला असून, ग्राहकांची फसवणूकही टळते. म्हणूनच अवनी लँड डेव्हलपर्सने ग्राहकांसाठी दोन दिवस उत्तम ऑफर ठेवल्या आहेत.

- अनिल नाईक, अवनी लॅंड डेव्हलपर्स

राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुण्याची देशभरात ओळख आहे. त्यात मुंबई आणि पुण्याचा विस्तार होत असून, मुंबईतून पुण्यातही स्थलांतर होत आहे. त्यामुळे पुण्यातील रिअल इस्टेट मार्केट वाढताना दिसत आहे. आधुनिक घरांमध्ये लोकांना जास्त आपुलकी वाटत आहे. ‘सकाळ वास्तू’मध्ये लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

- यश काळभोर, व्यवस्थापकीय संचालक, रचना लाइफस्टाइल

आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या एक्स्पोच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक विकसक, प्रकल्पांचे विविध पर्याय आणि नावीन्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध आहेत.

- अभिजित निकम, नंदन बिल्डकॉन

सकाळ वास्तू एक्स्पोचा आज शेवटचा दिवस

‘सकाळ वास्तू एक्स्पो’चा रविवारी (ता. २६) शेवटचा दिवस आहे. घराच्या शोधात असलेल्यांना मदतीचा ठरणारा हा दोनदिवसीय एक्स्पो बाणेरमधील माऊली गार्डनमध्ये आहे. त्यात शहरातील २० हून अधिक विकसकांच्या विविध भागांतील ६० हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.

वन, टू, थ्री, फोर बीएचके प्लॅट, व्यावसायिक जागा, बंगलो, रो-हाउस, फार्महाउस, वीकेंड होम, रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एनए प्लॉटचे प्रकल्प यांची माहिती एक्स्पोत असेल. त्यामुळे आपली गरज, बजेट आणि ठिकाण या सर्वांचा मेळ घालत घरखरेदीचा निर्णय ग्राहकांना घेणे सोपे होणार आहे.

एक्स्पोबाबत...

कधी : रविवार (२६ मे)

कुठे : माऊली गार्डन, बाणेर

केव्हा : सकाळी १० ते रात्री ८

सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.