दररोज वा मासिक खर्चातून बचत किंवा फ्लॅटमधील गुंतवणुक झाल्यानंतर अनेक गुंतवणुकदार हे प्लॉटमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात.
जागा खरेदी करून त्यावर स्वतःचे हक्काचे घर, निसर्गाच्या सान्निध्यात सेकंड होम वा मोक्याच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेस उभारणे, त्यातून हवा तसा परतावा मिळवणे हा गुंतवणुकीचा प्रकार आता नवीन नाही. योग्य लोकेशन वा मागणी असलेल्या लोकेशनला घेतलेल्या जागा वा जमिनीचा कालांतराने चांगला परतावा मिळतोच. निवासी जमिनीतील गुंतवणूक ही हमखास परतावा देणारी आहे, कारण जमिनीचे भाव सोने, दागिन्यांसारखे कमी जास्त होणारे नसतात, ते वाढतच असतात. कालांतराने जमिनीतून मिळणारा परतावा हा अपेक्षेपेक्षा अधिक असतो. मात्र, बऱ्याच वेळा असा क्लिअर टायटल, वाद नसलेला प्लॉट, एन. ए. केलेले प्लॉट विकणारा विकासक वा कंपनी कोणती, तिथे आपण सेकंड होम उभा करायचे म्हटले तरी उर्वरित सुविधा मिळविण्यासाठी करावी लागणारी धावपळ या साऱ्या गोष्टी मागोमाग आल्याच पण मुळात असा क्लिअर टायटलचा प्लॉट आणि अशा प्लॉटचा समावेश असलेले प्रकल्प कुठे मिळणार, असे प्रश्न प्रत्येक गुंतवणुकदाराच्या समोर नेहमी असतो.
दररोज वा मासिक खर्चातून बचत किंवा फ्लॅटमधील गुंतवणुक झाल्यानंतर अनेक गुंतवणुकदार हे प्लॉटमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. अनेक वेळा भविष्यात सेकंड होमच्या उभारणीसाठी वा चांगला परतावा मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण ओपन प्लॉटमध्ये गुंतवणुक करताना दिसतात. अशा सर्वांसाठी सकाळ माध्यम समूहातर्फे `सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो`चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३० जुलै आणि रविवार, ३१ जुलै २२ रोजी कर्वेनगर मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनल हॉल येथे हे प्रदर्शन होते आहे. या प्रदर्शनात वीसहून अधिक विकसकांचे ५०हून अधिक प्लॉटिंगचे प्रकल्प आपल्या गुंतवणुकीसाठी व चॉईससाठी उपलब्ध असणार आहेत.
प्लॉटचे लोकेशन, त्यासाठीचे बजेट, त्या प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या सुविधा, शहरापासूनचे अंतर, आसपास निसर्ग कसा आहे, त्या प्लॉटवर कोणत्या पद्धतीचे व किती बांधकाम करू शकता येईल, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला थेट विकसकांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून मिळणार आहे.. ज्यामुळे तुमची गुंतवणुक अधिक सुरक्षित असणार आहे. विशेष म्हणजे, आपल्या चांगल्या गुंतवणुकीसाठी व त्यासाठी आपल्यासमोर चांगले तीन चार पर्याय असावेत असा विचार करून थांबून असलेल्या इथे प्रदर्शनाला भेट दिल्यास चांगल्या प्लॉटमधील गुंतवणुकीची संधी साधता येणार आहे.
‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’
कधी : शनिवार, ३० व रविवार ३१ जुलै २०२२
कुठे : सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८
संपर्क
काव्या : ९६६५५५९५३६
प्रवीण : ७३८७७१०४०४
जय : ९७६४६७२४३१
रवींद्र : ९६०४२ ६६ २५५
सिद्धार्थ : ८५५४०११५११
सागर : ७७२००३४९५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.